अलास्काच्या समुद्रात मिळाला सोनेरी गोळा
खोल समुद्रात हा गोळा पाहून वैज्ञानिक अवाक्
अमेरिकन वैज्ञानिक संस्था एनओएएच्या ओशन एक्स्प्लोरेशनने अलास्काच्या किनाऱ्यानजीक समुद्रात सोन्याचा गोळा पाहिला आहे. याचा आकार काहीसा चौकोनी देखील होता. तसेच यात एका बाजूला छिद्र होते. या गोल्डन गोळ्याचा शोध एनओएएच्या रिमोटली ऑपरेटेड अंडरवॉटर व्हेईकलने लावला आहे. या गोळ्याला पाहिल्यावर जहाजातील वैज्ञानिक थक्क झाले आहेत.
हा सोन्याचा गोळा पृष्ठभागाशी अत्यंत मजबुतीने जोडला गेलेला होता. यामुळे तो बाहेर काढण्यासाठी रोबोटिक व्हेईकलने प्रथम व्हॅक्यूम आर्म पुढे केला, मग गोळ्याला एका दिशेने तोडल्यावर तो व्हॅक्यूम आर्ममध्ये आला आहे. हा सोन्याचा गोळा सुमारे 4 इंच लांब-रुंद आणि उंचीचा होता, ज्यात एका दिशेने छिद्र होते.
हो गोल्डन गोळा एखाद्या रहस्यमय प्रजातीच्या अंड्याचे आच्छादन असू शकते. किंवा एखादा मृत स्पॉन्ज किंवा कोरल असू शकते. परंतु गोल्डन गोळ्यात असलेल्या छिद्र पाहता याच्या आत काहीतरी जाण्याचा प्रयत्न करत होता किंवा त्यातून काहीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता हे स्पष्ट आहे.
ना अवयव ना मांस
एखादा रहस्यमय जीव त्यात विकसित होत असावा, जो मध्येच मारला गेला असावा केवळ त्याचे आवरण शिल्लक राहिले असावे असेही मानले जात आहे. या गोल्डन गोळ्यात अंड्याप्रमाणे हॅच राहिले असावे. परंतु तो जीव छोटा निश्चितच असावा असेही मानण्यात येते. हा गोळा प्रयोगशाळेत नेण्यात आला तोपर्यंत तो फुटला होता, त्याचा स्पर्श मांसल होता, कुठलीच एनाटोमी नव्हती.
अंड्याच्या आवरणाप्रमाणे
इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ प्लायमाउथचे डीप-सी इकोलॉजिस्ट केरी होवेल यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. हे एखाद्या अंड्याच्या आवरणाप्रमाणे दिसून येत असून अशाप्रकार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. जर खरोखरच हे अंड्याचे अवशेष असतील तर ते कुठल्या प्राण्याचे हे जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे. हे कुठल्याही माशाचे किंवा छोट्या जीवाचे अंडे निश्चितच नसेल असे होवेल यांनी म्हटले आहे.
तसेच खोल समुद्रात मिळाले असल्याने सामान्य सागरी जीव तेथे राहू शकत नाही. सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. तापमान देखील गोठविणारे असते. इतक्या थंडीत कुठल्याप्रकारचे जीव तग धरू शकतात यावर अध्ययन केले जात आहे. अनेकदा असे विचित्र जीव समोर येतात, ज्यांच्याविषयी काहीच माहिती नसते.