For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालिकेवर लैगिंक अत्याचार करून खून

12:17 PM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालिकेवर लैगिंक अत्याचार करून खून
Advertisement

बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह : वाडे-वास्को येथील घटनेने सर्वत्र खळबळ

Advertisement

वास्को : वाडे वास्को येथील एका इमारत बांधकामाच्या ठिकाणी साडेपाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना शुकवारी पहाटे उघडकीस आली. वास्को पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूध्द खुनाचा व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाने वास्कोतील नागरिकांना धक्काच बसला आहे. या बालिकेचा मृतदेह शुक्रवारी पहाटे संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे तिच्यावर कुणीतरी लैंगिक अत्याचार करून तिचा जीव घेतला असावा असा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला होता. या संशयावर शुक्रवारी रात्री शिक्कामोर्तब झाले. बालिकेच्या शवचिकित्सा अहवालात तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे तसेच तिचा तोंड व गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी शुक्रवारी रात्री दिली. अज्ञाताविरूध्द खुनाचा व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाडे वास्को येथील एका शिक्षण संस्थेजवळच्या भागात एका मोठ्या इमारतीचे बांधकाम चाललेले असून याच ठिकाणी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर बालिका रात्री बेपत्ता झाल्याचे आढळून आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला असता त्यांना ती बेशुध्दावस्थेत असल्याचे दिसले. तिच्या नाकातून फेस येत होता. त्यामुळे त्यांनी तिला लगेच चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पहाटे तीनच्या सुमारास हॉस्पिटलकडून वास्को पोलिसांना यासंबंधी माहिती मिळताच पोलिसांनी चिखलीच्या हॉस्पिटलकडे धाव घेतली व चौकशीला प्रारंभ केला. शुक्रवारी सकाळी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी उपअधीक्षक संतोष देसाई, पोलीस निरीक्षक कपील नायक व इतर पोलिसांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच आयजीपी ओमवीर सिंग यांनी वास्कोत दाखल होऊन पोलिसांना मार्गदर्शन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.