महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीस डंपरने चिरडले

04:42 PM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड : 

Advertisement

येथील नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अनेक वळणमार्ग तयार केले आहेत. मात्र अवजड वाहनांच्या वेगाला अन् मनमानीला मर्यादा नसल्याने निष्पाप जीव जात आहेत. सोमवारी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात डेन्टलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला डंपरचालकाने चिरडल्याची घटना घडली. या घटनेने कराडकर प्रचंड संतप्त झाले असून अवजड वाहनांच्या वेग मर्यादेवर प्रशासन काय उपाययोजना करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement

सोनिया अविनाश कांबळे (वय 24, रा. बनपुरीकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) असे अपघातात जीव गमावलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कराड शहरात येण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर जाधव आर्केडसमोर वळणमार्ग केला आहे. या वळणमार्गावरून कराड शहरात वळण घेत असताना सोनिया हिच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागला. या धक्क्याने सोनियाची दुचाकी रस्त्यावर आपटली गेली. यात सोनिया एका बाजूला तर तिची स्कूटी दुसऱ्या बाजूला पडली. सोनियाच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांना धसका बसला. रक्तबंबाळ अवस्थेतील सोनियाला नागरिकांनी घटनास्थळावर समोरच असलेल्या डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या समर्थ हास्पिटल येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

कराडकरांची संतप्त भावना

सोनियाकडे असलेल्या कागदपत्रांवरून तिची ओळख पटली. कराड शहर पोलिसांसह वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोनियाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत सोनियाच्या मैत्रिणींसह मित्र, प्राध्यापक यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच मित्र मैत्रिणींसह प्राध्यापकांनाही अश्रू अनावर झाले. तिच्या नातेवाईकांचा टाहो मन हेलावणारा होता. सोनिया ही प्रतिष्ठित कुटुंबातील होती. तिचे वडील अविनाश कांबळे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तिच्या अपघाती जाण्याने कराडकरांच्या संतप्त भावना आहेत. नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे अनेक जीव गेले असून आणखी किती जीव घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article