महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धर्मवीर संभाजी चौकात उभारण्यात आली गॅलरी

11:25 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : प्रशासनाकडून अनंत चतुर्दशी दिवशीच्या विसर्जनाची तयारी केली जात आहे. रविवारी धर्मवीर संभाजी चौक येथे भाविकांसाठी गॅलरी उभारण्यात आली. त्यामुळे बेळगावसह आसपासच्या परिसरातून आलेल्या भाविकांना गॅलरीमधून गणेशमूर्ती तसेच मिरवणूक पाहता येणार आहे. मंगळवार दि. 17 रोजी घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठी बेळगाव सर्वच विसर्जन तलावांवर बॅरिकेड तसेच निर्माल्य कुंड, प्रकाश योजना बसविण्यात आली आहे. नागरिकांची एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी कपिलेश्वर मंदिर परिसरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी धर्मवीर संभाजी चौकात गॅलरी उभारण्यात आली नव्हती. यामुळे बेळगावच्या गणेशभक्तांना जागा मिळेल तेथे उभे राहून विसर्जन मिरवणूक पहावी लागली. त्यामुळे गणेशभक्तांमधून नाराजीही व्यक्त करण्यात आली. यावर्षी मात्र दोन दिवस आधीच धर्मवीर संभाजी चौकात गॅलरी तसेच स्टेज उभारण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article