For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनोखे डोळे असणारे बेडुक

06:52 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनोखे डोळे असणारे बेडुक
Advertisement

प्रत्येक डोळ्यावर असतात तीन पापण्या

Advertisement

रेड-आइड ट्री फॉग अत्यंत अद्भूत जीव असून तो कलरफूल असतो. याच्या शरीरावर हिरवा, नारिंगी आणि निळा रंग आढळून येतो. या बेडकाचे डोळे अत्यंत अनोखे असतात. जे चमकदार लाल रंगांचे असतात. याच्या प्रत्येक डोळ्यावर तीन पापण्या असतात, या बेडकांच्या डोळ्यांवर तीन पापण्या असण्यामागे अत्यंत चकित करणारे कारण आहे.

या प्रकारचा बेडुक मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळून येतो. रेड-आइड ट्री फॉगच्या दोन पारदर्शक पापण्या असतात. एक खाली आणि एक वर आणि तिसरी अर्थ पारदर्शक पापणी ज्याला निक्टेटेटिंग पाणी म्हटले जाते, ती या बेडकांच्या डोळ्यांना अनेक प्रकारच्या धोक्यांपासून वाचवत असते. याच्या पापण्या पाण्यात डोळ्याचे रक्षण करणे आणि जमिनीवर डोळ्यांमध्ये ओलावा राखण्याचे काम करतात. अशाप्रकारच्या बेडकाचे डोळे अनोख्याप्रकारच्या डिझाइननी युक्त असतात.

Advertisement

रेड-आइड ट्री फॉगचे शास्त्राrय नाव अगलीचनिस कॅलिड्रियास आहे. हा बेडुक निळ्या आणि पिवळ्या पट्ट्या असलेल्या स्वत:च्या चमकणाऱ्या हिरव्या रंगाच्या शरीरासाठी ओळखला जातो. स्वत:च्या चमकणाऱ्या रंगामुळे हा बेडुक वातावरणात सहजपणे मिसळून जातो, यामुळे शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी तो छलावरण तयार करत असतो.

हा बेडुक स्वत:च्या लाल रंगाच्या चमकदार डोळ्यांद्वारे शिकाऱ्यांना चकवू देखील शकतो. रंगाच्या या अचानक चमकण्यामुळे शिकारी अनेकदा इतके आश्चर्यचकित होतात की ते क्षणभरासाठी ते भ्रमित होतात. तर बेडकासाठी स्वत:चा बचाव करण्यासाठी एक सेकंदाचा क्षण असतो. जंगलात या बेडकाचे सरासरी आयुर्मान 5 वर्षे इतके असते.

Advertisement
Tags :

.