शरीर फाडून शस्त्र बाहेर काढणारा बेडुक
निसर्गाने जीवांना बचावासाटी अनेक अदभूत क्षमता दिल्या आहेत. असाच एक विचित्र बेडुक आफ्रिकेत आढळून येतो. या बेडाकला हेयरी फ्रॉग किंवा वूल्वरिन फ्रॉग नावाने ओळखले जातो. धोका जाणवताच हा बेडुक स्वत:च्या शरीराच्या हाडांना तोडून एक घातक शस्त्र काढतो, यामुळे शिकारी जीवही घाबरून जातात. हे शस्त्र म्हणजे त्याचे टोकदार पंजे असतात. या बेडकाची ही अविश्वसनीय क्षमता वैज्ञानिक जगतात दीर्घकाळापासून कोडं ठरली आहे. तसेच जीवन वाचविण्यासाठी जीव कुठल्याही थराला जाऊ शकतो हे सिद्ध करणारा हा प्राणी आहे. या बेडकाला शास्त्राrय स्वरुपात ट्रायकोबॅट्राचस रोबस्टस नाव प्राप्त आहे.
या प्रजातीच्या नर बेडकांच्या शरीराच्या काठावर आणि मागील पायांवर पातळ केसासारखे त्वचेचे धागे उगवतात. ही अनोखी क्षमता बेडकांना अधिक ऑक्सिजन शोषून घेण्यास मदत करते. खासकरून नर बेडुक पाण्यात अंड्यांची राखण करत असताना ही क्षमता उपयुक्त पडते. या बेडकाचे आत्मरक्षणाचे तंत्र असामान्य आहे. हा बेडुक स्वत:च्या पायांच्या हाडांना तोडून टोकदार पंज्यात बदलणे आणि त्वचेला फाडून बाहेर काढत असतो. या बेडकांमध्ये पंजे असल्याचे वैज्ञानिकांना 1990 च्या दशकात दिसुन आले होते. हे वैशिष्ट्या उभयचरांसाठी अत्यंत दुर्लभ आहे. मग 2000 च्या दशकाच्या प्रारंभी हे प्रत्यक्षात केराटिनेने निर्मित पंजे नव्हे तर विकृत हाडं असल्याचे वैज्ञानिकांनी शोधले. याच हाडांना तोडून बेडुक अंतिम रक्षण तंत्राच्या स्वरुपात वापरत असतो.
कॅमेरूनचे शिकारी या बेडकांच्या या टोकदार शस्त्रांबद्दल जाणून होते आणि त्यापासून जखमी होणे टाळण्यासाठी बेडकांना पकडताना भाला किंवा चाकूचा वापर करायचे. बेडकाचे पंजे शिकारी प्राणी आणि माणसांना खोल जखम करू शकतात. याच भीतीमुळे या बेडकांसमोर येताच शिकारीही घाबरू लागतो. या बेडकाच्या टोकदार पंज्याला सक्रीय करण्याचे हे तंत्र पशुसृष्टीत सर्वात अनोखे आहे. प्रत्येक हाडाचा पंजा बेडकाच्या पायाच्या बोटावरील पेशीत स्थित एका गाठीद्वारे कोलेजनच्या मजबूत रेशेंशी जोडलेला असतो असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.
हाडं तुटल्यावरही राहतो जिवंत
हा बेडुक स्वत:च्या हाडांना मोडून मृत्युमुखी का पडत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. ही अदभूत पुनर्जीवित होण्याची क्षमताच या असामान्य आत्मरक्षण तंत्राला बेडकाला कुठलेही गंभीर नुकसान पोहोचू न देता काम करू देते. परंतु पंज्याला परत मागे घेण्याचे स्पष्ट तंत्र अद्याप दिसून आलेले नाही. परंतु तुटलेली हाडं पुन्हा ठीक झाल्यावर हेयरी बेडकाचे पंज्ये निष्क्रीय स्वरुपात नंतर परत आत जातात असा दावा काही वैज्ञानिक करतात. ही क्षमता याला वारंवार या धोकादायक बचाव तंत्रज्ञानाचा वापर करण्याची अनुमती देते. ट्रायकोबॅट्राचस रोबेस्टस बेडुक मध्य आफ्रिकन देश म्हणजेच कॅमेरून, कांगो, नायजेरिया, गॅबोन, अंगोला आणि इक्वेटोरियल गिनीमध्ये आढळून येतो.