For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोसळलेल्या वृक्षातून जन्मणार साडेसातशे वड !

10:45 AM Jun 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोसळलेल्या वृक्षातून जन्मणार साडेसातशे वड
Advertisement

पडलेल्या वडाची फांदी जिल्हा परिषद प्रत्येक गावात लावणार : मूळ वृक्षाचे आहे तिथेच पुनर्रोपण

गिरीश नलवडे सोनी

चारशे वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला असला तरी त्याचा भार हलका करण्यासाठी त्याच्या फांद्या तोडून त्यातील 750 फांद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात या वटवृक्षाची शाखा म्हणून लावण्याचा आणि संवर्धनाचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. मूळ वटवृक्षाचे भोसे येथे आहे तेथेच महामार्गाजवळ पुन्हा रोपण करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडामिसे यांनी ही माहिती दिली.

Advertisement

मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी आ†धकारी शशिकांत शिंदे, गट विकास अधिकारी अविनाश पाटील, ग्रामसेवक विनायक मोरे यांनी यलम्मा मंदिर परिसरात वटवृक्ष येथे भेट दिली, यावेळी प्रवीण शिंदे, भोसे सरपंच पारीसनाथ चौगुले, विकास चौगुले, अमोल गणेशवाडे तसेच वन विभागाचे सह्यायक वन संरक्षक अजित साजने यांच्या सूचनेनुसार वन विभागाकडून वनपाल तुषार भोरे उपस्थित होते.

या वृक्षाचे बॅटन गावोगाव जपा
चारशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष ही खूप मोठी देणगी आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्याला जपण्याचा प्रयत्न केला पण हा वृक्ष काही कारणांनी कोसळला. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावाने शिवाजी महाराजांच्या काळापासूनच्या या वृक्षाला बॅटनच्या रूपाने आपल्या गावात नेऊन त्याचे रोपण आणि जतन करावे आणि चारशे वर्षांचा वृक्ष आपल्याही गावात जिवंत करावा.
- सयाजी शिंदे अभिनेते आणि प्रमुख देवराई

आम्ही हा वटवृक्ष जपू
मिरज तालुक्यातील भोसे येथील चारशे वर्षांचा वटवृक्ष जपला पाहिजे आणि तो जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुन्हा रोपण करून त्याचे संवर्धन केले पाहिजे, असे जिल्हा परिषदेची धारणा आहे. सर्व ग्रामपंचायत हा आगळावेगळा प्रयोग यशस्वी करतील याची मला खात्री आहे.
- तृप्ती धोडामिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पारिषद सांगली

Advertisement

भोसे येथील यलामा मंदिर शेजारील वटवृक्ष ही भोसे गावाची ओळख आहे. चारशे वर्षे पूर्वीचा हा ठेवा कोसळल्यामुळे ओळख पुसली जाणार आहे. परंतु या वटवृक्षाचे पुनर्वरोपण झाल्यास हा ठेवा जपण्यास मदत होणार आहे
प्रकाश चौगुले ग्रामस्थ, भोसे

Advertisement
Tags :

.