For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भग्न प्रतिमा संकलनाला चळवळीचे स्वरुप

10:38 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भग्न प्रतिमा संकलनाला चळवळीचे स्वरुप
Advertisement

बेळगाव : हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे अपमान टाळण्यासाठी सुरू केलेल्या प्रतिमा संकलनाच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरुप दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांनी सुरू केलेला हा उपक्रम आता गावोगावी पोहोचला आहे. भित्तीपत्रकांच्या माध्यमातूनही जागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाला व्यापकता आणण्याचे प्रयत्न हाती घेतले आहेत. यासाठी बसवण कुडची येथे कार्यक्रम राबविला. कलमेश्वर मंदिर परिसरात जागृती केली. रस्त्याशेजारी, झाडाखाली, मंदिर परिसरात टाकलेल्या भग्न प्रतिमा जमवून विधिवत त्यांचे विसर्जन केले जाते. नागरिकांनी भग्न प्रतिमांचे अपमान करू नयेत. जीर्ण प्रतिमांची काच व फ्रेम वेगळी करून काचेचा पुनर्वापर करावा. जीर्ण प्रतिमा व फ्रेम अग्निला समर्पित करून त्याची राख झाडांना घालावी, असे आवाहन वीरेश हिरेमठ यांनी केले आहे. यावेळी नीलकंठय्या राचय्या हिरेमठ, नगरसेवक बसवराज मोदगेकर, परशुराम बेडका, सुनील मायाण्णाचे, शीतल पाटील, मारुती कणबरकर व कुडची येथील कलमेश्वर मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.