डेंग्यू नियंत्रणासाठी नगरसेवकाने घेतली हातात फॉगिंग मशीन
10:35 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव परिसरात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सर्व स्तरातून विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत. आपल्या वॉर्डात डेंग्यू होऊ नये यासाठी नगरसेवकाने आपल्या हातात फॉगिंग मशीन घेऊन वॉर्डातील सर्व परिसरात औषध फवारणी केली. बसवण कुडची परिसरातील वॉर्ड नं. 48 येथे ही औषध फवारणी करण्यात आली असून नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे वार्डातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.स्वत: हातात फॉगिंग मशीन घेऊन संपूर्ण वॉर्ड परिसरातील गल्ल्या, गटार तसेच अस्वच्छ परिसरात औषध फवारणी केली. परशराम बेडका, संजू बडगे आदींसह वार्डातील महिलांनी या नगरसेवकाचे आभार मानले.
Advertisement
Advertisement