एका माशीने जिंकविले 8 कोटी रुपयांचे इनाम
नशीब साथ देते तेव्हा कुठून ना कुठून मदत मिळते आणि काही क्षणात बाजी पलटत असल्याचे बोलले जाते. असाच प्रकार एका गोल्फच्या सामन्यादरम्यान दिसून आला आहे. येथे एका माशीमुळे एका इसमाने 8 कोटी रुपये जिंकले आहेत. ही कहाणी ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लीटवुडची असून त्याला बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळविण्यास एका माशीने मदत केली. या घटनेमुळे अमेरिकेत पार पडलेली बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप अत्यंत चर्चेत आहे. येथे एका 34 वर्षीय गोल्फर टॉमी फ्लीटवुड एका माशीमुळे 8 कोटी रुपये जिंकला आहे. बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप एक ऐतिहासिक प्रोफेशनल गोल्फ स्पर्धा आहे. ही पीजीए टूरच्या फेडएक्सकप प्लेऑफ्सचा दुसरा टप्पा आहे. यात जगातील सर्वोत्कृष्ट 70 गोल्फर परस्परांशी स्पर्धा करतात. या स्पर्धेला 2007 पासून बीएमडब्ल्यू स्पॉन्सर करतेय.
टॉमी फ्लीटवुडने गोल्फ सामन्यादरम्यान शॉट मारताच बॉल होलनजीक जाताच थांबला होता, यानंतर टॉमी निराश झाला आणि त्याला हातून संधी गमावल्याचे वाटले. परंतु त्वरित एक चमत्कार घडतो, थांबलेल्या बॉलनजीक एक माशी येते आणि ज्यानंतर बॉल हलू लागतो आणि पाहता पाहता होलमध्ये जातो. यानंतर गोल्फरला विजयी मानले जाते. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तुमचे नशीब तुमच्या हारला कशाप्रकारे विजयात बदलू शकते हे दिसून येते.