सडलेल्या मांसाप्रमाणे गंध असलेले फूल
दिसण्यास अत्यंत सुंदर
जगात काही फूल सुंदर असतात तर काही काही फुलं सुगंधासाठी प्रसिद्ध असतात. परंतु एक फूल सुंदर असले तरीही स्वत:च्या अजब आणि सहन न होणाऱ्या गंधासाठी ओळखले जाते. कॅरियन फूलाला शव फूल या नावानेही ओळखले जाते. कॅरियन हे एक आकर्षक आणि रहस्यमय रोप असून ते अनेक अनोख्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते.
कॅरियन फूलाचे रोप हे स्टेपेलिया जीनसशी संबंधित असून ते स्वत:च्या आकर्षक रुपासोबत परागीकरण करणाऱ्या किटकांना आकर्षित करण्याच्या असामान्य पद्धतीसाठी ओळखले जाते. हे रोप केवळ दक्षिण आफ्रिकेतच आढळून येते, परंतु आता ते अनेक प्रकारच्या हवामानांमध्ये वाढू लागले आहे आणि आता या फुलाचे रोप स्वत:च्या उद्यानांमध्ये लावणे लोक पसंत करत आहेत.
सडलेल्या मांसाचा गंध हे या फुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. याच्याद्वारे ते खास पद्धतीने माशांना स्वत:च्या दिशेने आकर्षित करते. याच्या मदतीने यात परागीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. हा गंध माणसांना अत्यंत खराब वाटतो. परंतु वैज्ञानिक या गंधाचा वापर माणसांमधील भूक मिटविण्यासाठी वापर करू पाहत आहेत.
कॅरियन फुलाचे वैशिष्ट्या याचा आकार देखील आहे. हे फूल अनेकदा अत्यंत मोठे होते आणि त्याचा व्यास 16 इंचापर्यंत फैलावत असतो. ताऱ्याप्रमाणे दिसणारे हे फूल प्रत्यक्षात अत्यंत सुदर फुलांमध्ये गणले जाते, या फुलाच्या वेगवेगळ्या रंगाच्या अनेक प्रजाती असतात.
कॅरियन फूलाचे रोप देखील खास असते आणि ते कोरड्या भागांमध्ये उगवू शकते. हे दीर्घकाळापर्यंत दुष्काळ झेलू शकते. याची पाने अत्यंत कोरड्या वातावरणातही तग धरून राहू शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या कोरड्या आणि वाळवंटी भागात ही रोपं मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या रोपाला असलेली कमी पाण्याची गरज आणि स्वत:च्या सौंदर्यामुळे ही उद्यानांमध्ये खास करून उगविले जाते. रॉक गार्डन्समध्ये हे रोप दिसण्याची शक्यता अधिक असते. कॅरियन रोपाला येणारे फळ सोनेरी किंवा नारिंगी रंगाचे असते आणि ते माणसांसाठी विषारी असते. एक फूल सुमारे 400 हून अधिक फळांची निर्मिती करू शकते.