पाण्यावर तरंगणारी झोपडपट्टी
नाल्यामधून नौकाविहार : टोळीयुद्धाची सतावते भीती
मुंबईतील धारावी या झोपडपट्टीला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टींपैकी एक आहे. परंतु आफ्रिकेतील एका देशात अशी झोपडपट्टी आहे, जी पाहून तुम्हाला धारावी खूपच बरी असे वाटू लागेल. आफ्रिकेतील ही झोपडपट्टी पाण्यावर तरंगणारी आहे. चहुबाजूला नाल्याचे घाण पाणी असून त्यावर नौकेतून लोक ये-जा करत असतात. येथे सर्वात मोठा धोका टोळीयुद्धाचा असतो, यामुळे अनेक लोकांना येथे जीव गमवावा लागला आहे.
डेनियल पिंटो हा ट्रॅव्हलर आणि इन्स्टाग्राम इंफ्लुएंसर अलिकडेच आफ्रिकेतील नायजेरियात पोहोचला होता. तेथे त्याने शहरात निर्मित तरंगणारी झोपडपट्टी पाहिली. या ठिकाणाचे नाव मकोको असून तो नायजेरियाच्या लागोस शहरात पाण्यात निर्मित सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. येथे लोक नाल्याच्या घाण पाण्यादरम्यान लाकडी घरांमध्ये राहतात. पाण्यावर नौका चालतात, याचमुळे याला नायजेरियाचे व्हेनिस असेही म्हणतात. आता इतक्या सुंदर शहराची तुलना या ठिकाणाशी करणे मूर्खपणा आहे, परंतु येथील लोक याला व्हेनिसच मानतात.
डेनियलने या ठिकाणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो नौकेतून प्रवास करताना दिसून येतो. हे ठिकाण धोकादायक आहे, कारण येथे टोळ्यांचे मोठे वर्चस्व आहे तसेच येथे दररोज टोळीयुद्ध होत असते. पाण्याच्या चहुबाजूला कचरा दिसून येतो. 19 व्या शतकाच्या प्रारंभी ही वस्ती निर्माण झाली होती, जी मच्छिमारांनी वसविली हीत. त्यांना हे ठिकाण मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त वाटल्यानेच त्यांनी येथे स्थानिक होण्याचा पर्याय निवडला होता. विदेशी नागरिकांनी येथे येऊ नये कारण येथे त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसूल केले जातात. काही रुपयांमध्ये लोक येथील सैर घडवूत आणत असल्याचे डेनियलने सांगितले.
डेनियलच्या या व्हिडिओला 36 लाख ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेक लोकांनी यावर कॉमेंट केली आहे. नायजेरियात अनेक विकसित ठिकाणं देखील आहेत, तेथे जात नायजेरियाचे सौंदर्य देखील दाखवावे अशी सूचना करण्यात आली.