महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हापसा एकतानगर गृहनिर्माण वसाहतीमधील फ्लॅट फोडला

03:50 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : म्हपसा एकतानगर गृहनिर्माण वसाहतीमधील एक फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फ्ढाsडला. फ्लॅटमालक रामनारायण सिंग हे पत्नीसह दार्जिलिंगला गेल्याने नेमके किती किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला हे स्पष्ट झाले नाही. म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत हल्ली चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंदिरातील फ्ंढडपेट्या फ्ढाsडल्यानंतर चोरट्यांनी आता आपला मोर्चा घरांकडे वळविला आहे. अलीकडेच चोरट्यांनी काणका येथे कपेल फोडून फंडपेटीतील 30 हजारांची रोख लंपास केली होती. तत्पूर्वी गणेशपुरी म्हापसा येथे घर फोडून दागिने चोरून नेले होते. सध्या गुह्याच्या बाबतीत म्हापसा पोलीस प्रकाशझोतात आले आहे.

Advertisement

एकतानगर मधील फ्लॅट फ्ढाsडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. गुऊवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाली असावी असा अंदाज आहे. बंद फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. दरवाजावरील लोखंडी फाटकाचा हूक तसेच दरवाजाच्या कडीचा हुक तोडला होता. लोकांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटे फोडून आतील सामान बिछान्यांवर फेकले होते. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे उघड झाले. फ्लॅटमालक  रामनारायण सिंग हे दार्जिलिंगला गेल्याने नेमके किती किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला हे समजू शकले नाही.म्हापसा पोलिसांनी हाऊसिंग बोर्डमध्येच राहणाऱ्या फ्लॅट मालकाच्या मुलाला पाचारण केले. कपाटांमध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि मूल्यवान वस्तू चोरट्यांनी पळविल्या. चोरीस गेलेल्या रोख रकमेत अंदाजे 15 हजारांचा समावेश असल्याची माहिती सुन दिव्या सिंग हिने दिली.  पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article