For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाणावली समुद्रात मच्छीमार बोट उलटली

12:35 PM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाणावली समुद्रात मच्छीमार बोट उलटली
Advertisement

11 मच्छीमारांनी पोहून किनारा गाठला : दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करावी

Advertisement

मडगाव : समुद्र खवळलेला असताना धोका पत्करून मासेमारीसाठी गेलेली बोट उलटण्याची घटना वाडी-बाणावली येथे घडली. या बोटीवरील 11 मच्छीमारांनी पोहत किनारा गाठला. तसेच समुद्रात उलटलेल्या बोटीलाही पुन्हा किनाऱ्यावर आणण्यात यश आले. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मच्छीमार बोट उलटण्याची घटना घडली होती. वाडी-बाणावली समुद्रात मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता मासेमारीसाठी गेलेली बोट जोरदार लाटेमुळे पाण्यात उलटण्याची घटना घडली. खराब हवामानातही मासेमारीसाठी जाणे मच्छीमारांच्या अंगलट आले. ही बोट पोपू ऊर्फ ग्रेफीन्स फर्नांडिस यांच्या मालकीची होती. या बोटीवर 11 मच्छीमार होते. किनाऱ्यापासून सुमारे 100 मीटर अंतरावर ही घटना घडली. सर्व मच्छीमाऱ्यांनी पोहून किनारा गाठला. बोटीतील सर्व मच्छीमार हे आंध्र प्रदेश व झारखंड येथील रहिवासी आहेत. बोट उलटल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी बोटीला दोरखंड बांधून पावणेबारा वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर आणले. ग्रेफिन्स फर्नांडिस यांच्या मालकीचीच बोट काही दिवसांपूर्वी बाणावली किनारी उलटली होती व त्यातील 13 मच्छीमारांना पोलीस, जीवरक्षक व मच्छीमारांनी वाचवले होते. खराब हवामान असतानाही धोका पत्करून बोटी समुद्रात घालण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. मच्छीमारी हंगाम सुरू झालेला असला तरीही हवामान पोषक असे नाही. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वी मच्छीमार खात्याने वेळीच उपाययोजना आखण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.