For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत शंभर फुटी रोडजवळील घराला आग

03:11 PM Nov 30, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत शंभर फुटी रोडजवळील घराला आग
Advertisement

                          सांगली शहरात घरांमध्ये आग लागण्याची घटना; प्राथमिक तपास सुरू

Advertisement

सांगली : सांगलीतील छत्रपती शाहू महाराज मार्ग १०० फुटी रोड लगत लतिफ पठाण कॉलनी येथे शनिवारी दुपारी लागलेली आग महानगरपालिका अग्निशमन दलाच्या तत्पर, धाडसी आणि समन्वयित कार्यवाहीमुळे अल्पावधीतच आटोक्यात आणण्यात आली. घरामध्ये एलपीजी सिलेंडर असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य अधिक होते. परंतु जवानांच्या अत्यंत सूज्ञ हस्तक्षेपामुळे मोठा स्फोट व अनर्थ टळला.

दुपारी तीन वाजता घरमालक प्रविण कावेठिया यांचे पत्र्याचे व लाकडी बांबूचे घर असून घरमालक कपडे विक्री व्यवसायानिमित्त बाहेर असल्याने घर लॉक होते स्थानिकांनीदलास कळविले. वर्दी मिळताच दोन अग्निशमन गाड्या खबरदारी म्हणून रवाना करण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. घरातील एलपीजी सिलेंडर तत्काळ आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला, ज्यामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका टळला. तातडीच्या हस्तक्षेपामुळे शेजारील घरांचे संरक्षण झाले.

Advertisement

या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य आणि रोख रक्कम जळून नुकसान झाले. कपाटातील मौल्यवान वस्तू मात्र सुरक्षित मिळाल्या. शेजारील घराच्या भिंतीस किरकोळ झळ बसली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे प्राथमिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

आगप्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांनी घरातील वायरिंग, स्विचेस व प्लग पॉइंट्सची वेळोवेळी तपासणी करावी, एकाच प्लगवर अनेक उपकरणे जोडणे टाळावे, ई.एल.सी. बी. आणि एम.सी.बी.सारख्या विद्युत सुरक्षा प्रणालीचा वापर करावा. एलपीजी सिलेंडर वापरल्यानंतर व घराबाहेर जाताना रेग्युलेटर बंद ठेवावा, पेट्रोल, डिझेलसारखे ज्वलनशील पदार्थ घरात साठवू नयेत असे आवाहन अग्निशमन विभागाने केले.

बचावकार्यात मुख्य अग्निशमन अधिकारी, सुनील माळी, सुरेश आलगुर, दत्तात्रय पाटील फायरमन, रोहन मुळीक फायरमन, लक्ष्मण धस, दत्तात्रय माने, रोहित म्हस्के फायरमन दत्तात्रेय माने लिडिंग फायरमन, विजय गवळी, बीळाप्पा हिंचगिरी हे धूर दिसल्यावर तातडीने अग्निशमन प्रमुख सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.