बसमध्ये राहतेय 8 लोकांचे कुटुंब
बसमुळे होतेय मोठी बचत
मानवी आयुष्यात आव्हाने येणार हे तर निश्चितच आहे. परंतु या आव्हानांना घाबरून हातपाय गाळणे चुकीचे आहे. या आव्हानांना सामोरे जात आयुष्यात वाटचाल करत रहावी लागते. इंग्लंडमधील एका कुटुंबाने असेच केले आहे. या कुटुंबाकडे 13 लाख रुपयांचे घरभाडे भरण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे या कुटुंबाने 8 लोकांसाठी एका बसमध्ये जागा निर्माण केली आणि त्यालाच स्वत:च्या घराचे रुप दिले. आता या पावलामुळे या कुटुंबाला लाभ होत आहे. कॉर्नवॉलच्या हेल्स्टन येथे राहणारे 30 वर्षीय एंटोनी टेलर आणि त्यांची पत्नी एमा एका अशा घराच्या शोधात होते, जेथे सहजपणे व्हिलचेअर चालविता येऊ शकेल. प्रत्यक्षात एंटोनी यांची 35 वर्षीय हैना दिव्यांग असून त्यांच्यासोबत राहते. एंटोनी आणि एमा या दांपत्याला 5 अपत्यं देखील आहेत. तसेच या कुटुंबाने एक श्वान पाळला आहे.
2019 मध्ये एंटोनी यांच्या आईचे निधन झाले होते, तेव्हा त्यांना नर्सिंग सेक्टरमधील स्वत:च्या कारकीर्द सोडून देत बहिणीसाठी पूर्णवेळ सहाय्यक व्हावे लागले होते. याचदरम्यान त्यांना घरमालकाकडून घर रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती. मग त्यांनी कौन्सिलला स्वत:च्या हिशेबानुसार घर तयार करण्याचे आवाहन केले, परंतु त्यांची मागणी फेटाळण्यात आली. मग त्यांनी डबल डेकर बसलाच स्वत:च्या घराचे स्वरुप देण्याचा विचार केला. दोन डबलडेकर बसेसना एकत्र चिकटविले आणि त्याला स्वत:च्या गरजांनुसार अॅडजेस्ट केले. आता घरात प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र खोली आहे. तसेच बाथरुम, किचन, ड्रॉइंग रुम इत्यादी सर्व सुविधा आहेत. त्यांनी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून बसला घराचे रुप दिले आहे. त्यांना ई-बेवर ही बस दिसून आली होती. बसला राहण्यायोग्य करण्यासाठी त्यांना 37 लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. परंतु आता त्यांच्या भाड्याची रक्कम वाचू लागली आहे. यानुसार ते आता दर महिन्याला 10 लाख रुपयांपर्यंत बचत करू लागले आहेत.