Miraj News : मिरज शासकीय रुग्णालयासमोर दुचाकीला डंपरची जोरदार धडक ; महिलेचा जागीच मृत्यू
मिरजेत भरधाव डंपरची धडक
मिरज : बघायला दिरासाठी मुलगी दुचाकीवरुन जाताना मागून आलेल्या भरधाव डंपरची धडक बसून महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी शहरातील मिरज शासकीय रुग्णालयासमोर घडली.नंदिनी मच्छींद्र दोलतडे (वय ३२) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात नोंद आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, नंदिनी दोलतडे व त्यांचे दिर मनोज दोलतडे दिराला मुलगी बघण्यासाठी मोटारसायकल (एमएच-१०-सीजे-४२२९) वरुन सोलापूरकडे जात होते. दुचाकी मिरज शासकीय रुग्णालयासमोरुन जात असताना वेगात आलेल्या डंपरने मागून धडक दिली. त्यानंतरदुचाकीवर मागे बसलेल्या नंदिनी यांचा तोल जावून त्या जमिनीवर कोसळताच डंपर अंगावरुन गेली. या अपघातात नंदिनी दोलतडे यांचा मृत्यू झाला.
मिळताच या अपघाताची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लगतच असलेल्या शासकीय रुग्णालयात नेला. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिरासाठी मुलगी बघायला जाणाऱ्या बहिनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने घटनास्थळी बघ्यांकडून हळहळ व्यक्त होत होती.