महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

व्हाळशीतील तळ्यात मगरीने नेला कुत्रा

12:43 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये घबराट 

Advertisement

डिचोली : व्हाळशी येथील तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या कुत्र्याला  मगरीने  जबड्यात धरून पाण्यात ओढून नेल्याने कुत्रा गतप्राण झाला. या प्रकारामुळे  परिसरात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. सदर प्रकार मंगळवार दि. 18 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. तळ्यातील पाणी पिण्यासाठी एक कुत्रा काठावर आला होता. पाणी पित असताना  मगरीने सदर कुत्र्याला चपळाईने काठावरच जबड्यात पकडले आणि  पाण्यात ओढून नेले. हा प्रकार तळ्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या स्थानिक युवकांनी पाहून आपल्या मोबाईलवर व्हिडीओ केला. परंतु अंतर बरेच असल्याने व्हिडीओत मगरीची स्पष्ट छबी आली नाही.

Advertisement

मगरीच्या वास्तव्यामुळे तळे परिसरात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. या तळ्यात दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही महिला कपडे धुतात,  स्थानिक युवक आंघोळ करतात, पोहण्याचा आनंद लुटतात. मगरीने कुत्र्याला भरदिवसा  पळविल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. या प्रकराची माहिती मिळताच आपण प्रथम प्राणीमित्र अमृत सिंह यांना कल्पना दिली. अमृत सिंह यांनी या परिसराची पाहणी केली. त्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना या विषयी कल्पना देण्यात आली असल्याचे नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी सांगितले.  आज बुधवार दि. 19 जून रोजी वन खात्याचे कर्मचारी या भागात येऊन पाहणी करणार. लोकांच्या सुरक्षिततेसाठी या मगरीचा कशा प्रकारे बंदोबस्त करता येईल यावर विचार केला जाणार आहे,असे नगरसेवक नाटेकर म्हणाले.

माणसांना धोका नाही : अमृत सिंह

मानवी वस्तीला लागून असलेले नैसर्गिक जलस्रोत, नदी, तळ्यांमध्ये असलेल्या मगरींपासून मानवी जीवाला धोका नाही. या मगरी माणसांना लक्ष्य बनवित नाहीत. कुत्रे, बकरी, गुरे असे प्राणी त्यांचे भक्ष्य असतात. त्यामुळे या मगरीमुळे माणसांना धोका नाही, कोणीही भिती बाळगण्याची गरज नाही, असे प्राणीमित्र अमृत सिंह यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article