For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माणसांसारखे कपडे घालणारा श्वान

06:33 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
माणसांसारखे कपडे घालणारा श्वान
Advertisement

दर महिन्याला एक लाखाची कमाई

Advertisement

हिरो-हिरोइन्सना पाहून लोक त्यांच्या स्टाइलचे अनुकरण करत असतात. त्यांच्याप्रमाणे कपडे परिधान करणे, त्यांच्यासारखा गॉगल वापरण्याची इच्छा  लोकांना असते. इंग्लंडमध्ये एका श्वानाला पाहून लोक देखील त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतात. कारण या श्वानाची स्टाइल, स्वॅग एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. हा श्वान माणसांप्रमाणे सजतो, तयार होतो आणि मोठी कमाई देखील करतो. दर महिन्याला हा श्वान करत असलेली कमाई अनेक लोकांपेक्षा अधिक आहे.

कोवेंट्री येथे राहणारा 25 वर्षीय कॅलम बार्बर हा बागकाम करतो. त्याच्याकडे केन कॉर्सो नावाच्या ब्रीडचा एक श्वान असून त्याचे नाव मिस्ट आहे. मिस्ट 2 वर्षांची मादी असून तिचा मालक तिला माणसांप्रमाणे सजवितो आणि स्टाइलिश शैली प्रदान करतो.

Advertisement

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर मिस्टचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. व्हिडिओत श्वान सायकलवर बसलेला, गॉगल घालून आणि स्टायलिश कपडे परिधान केलेल्या स्थितीत दिसून येतो. त्याचे व्हिडिओज व्हायरल होत असल्याने टिकटॉक ह्यूजमुळे त्याला पैसे मिळत आहेत. तसेच युनिव्हर्सल आणि एक्सपीडिया यासारख्या कंपन्या देखील त्याच्यासोबत व्यावसायिक भागीदारी करत आहेत. अशाप्रकारे तो दर महिन्याला सुमारे एक लाख रुपयापर्यंत कमाई करत आहे.

मिस्टच्या कमाईत एका वेगळ्या बँक खात्यात जमा करत आहे, ही रक्कम केवळ तिच्यासाठीच खर्च करत आहे. यात डॉक्टरचे बिल, कपडे इत्यादींचा खर्च सामील आहे. मिस्टवर मला गर्व असल्याचे कॅलम सांगतो.

Advertisement
Tags :

.