डॉक्टर महिला सायकलपटूंची विक्रमाला गवसणी!
चिपळूण :
चिपळुणातील डॉ. मनीषा वाघमारे व बंगलोरमधील डॉ. मीरा वेलणकर या दोन सायकलपटूंनी टँडम सायकलवरुन 42 दिवसात 7 राज्यांमधून तब्बल 3,800 कि.मी.हून अधिकचा प्रवास करत एक नवीन जागतिक विक्रम स्थापित केला आहे. एवढे अंतर टँडम सायकलने पार करणाऱ्या त्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत. भारताच्या पूर्वेकडील पहिले गाव असलेले किबिथू येथून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास अऊणाचल, आसाम, प. बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून पुढे भारताच्या पश्चिम टोकावरील कोटेश्वर येथे समाप्त झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून या विक्रमाची नोंद घेतली गेली असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
15 मे रोजी किबीथू येथे इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेला झेंडा दाखवला व तेथून डॉ. मनीषा वाघमारे, डॉ. मीरा वेलणकर यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात झाली. अरुणाचल प्रदेशमधील अत्यंत दुर्गम भागातील खडबडीत रस्ते, तीव्र चढ-उतार, सतत कोसळणाऱ्या दरडी, चिखल यांचा सामना करीत आसाम राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आसामच्या काझीरंगा अभयारण्यातून जाताना गेंडे, हत्ती, हरणं, मोर यांचे दर्शनही त्यांना झाले. प. बंगालची हद्द येईपर्यंत अनेकदा सायकल नादुऊस्त झाल्याने त्यांना आव्हानांचा सामना करावा लागला. चिकन नेक असं वर्णन असलेल्या भारताच्या या भूभागाला नेपाळ, बांग्लादेश, चीन व भूतान यांनी वेढले असल्याने येथे वैयक्तीक सुरक्षा हा सतत चिंतेचा विषय असतो.
- जुन्या सायकलची दुरुस्ती करत केले बिहार पार
बिहारमध्ये प्रवेश झाल्यानंतर सायकलची दुरवस्था झाल्याने त्यांना नवीन सायकल विकत घेणे अनिवार्य झाले. नवीन सायकल ताब्यात मिळेपर्यंत जुन्याच सायकलची ठिकठिकाणी दुऊस्ती करत त्यांनी बिहार राज्य पार केले. उत्तरप्रदेशमध्ये आल्यावर अयोध्येतील रामलल्लाचे आशीर्वाद घेत नव्या सायकलवऊन त्या दोघींनी कानपूरमार्गे आग्रा गाठले. आग्रा अगदी नजरेच्या टप्प्यात असताना एका बाईकस्वाराने या दोघींना धडक दिली. सुदैवाने किरकोळ जखमेवर सर्व काही निभावले. तेथे वर्ल्ड अल्ट्रा सायकलिस्ट असोसिएशनच्या एका नव्या विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर झाली.
- 47 अंश सेल्सिअसमध्ये प्रवास
बिहार, उत्तरप्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये प्रवेश झाल्यानंतर उन्हाच्या कडाक्याने परिसीमा गाठली होती. यावेळी 47 अंश सेल्सियसपर्यंत तापमान असल्याने त्या वातावरणाशी चांगलाच सामना करावा लागला. अशा स्थितीत रोजच्या वेळापत्रकात बदल कऊन त्या दोघींनी आपला प्रवास सुऊच ठेवला. राजस्थानमधील विरळ वस्तीच्या भूभागातून प्रवास झाल्यानंतर मोहिमेच्या अंतिम राज्यात म्हणजे गुजरात राज्यात त्यांचा प्रवेश झाला. असे असले तरी तो भूभाग राजस्थानशी साधर्म्य दाखवणारा आहे. उष्ण हवेच्या झळा, समोऊन येणारा वारा, रखरखीत वाळवंटी प्रदेश ओलांडत कच्छच्या रणातील त्यांचा प्रवास तितकाच खडतर होता.
दोन्ही बाजूस मिठाचा प्रदेश आणि मधून जाणारा रस्ता म्हणजे निव्वळ नयनसुख असले तरी त्रासदायक होता. रोड टू हेवन असे नाव असलेला निर्जन व आव्हानात्मक असा हा भूभाग पार कऊन पुढे आल्यावर आपण आपल्या उद्दिष्टाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात आलोय, या आनंदात उर्वरित अंतर पार कऊन दोघी कोटेश्वर येथे पोहोचल्या. किबीथू ते कोटेश्वर हे अंतर टँडम सायकलने पार करणाऱ्या पहिल्या महिला सायकलिस्ट हा विक्रम त्या दोघींनी पूर्ण केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून डॉ. वाघमारे व डॉ. वेलणकर यांच्या या विक्रमाची नोंद घेतली जात असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
- कौतुकास्पद कामगिरी
डॉ. मनीषा वाघमारे या चिपळूण सायकलिंग क्लबच्या नामांकित सायकलिस्ट असून एकाच वर्षात तीनवेळा सुपर रँडोनिअर, हजार बाराशे कि.मी. बीआरएम आदी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी यापूर्वी केली आहे. तर डॉ. मीरा वेलणकर या बंगलोरच्या निवासी असून आजवर अनेक मोहिमा त्यांनी केल्या असून लडाखमधील उमलिंगला सायकलिंग केल्याबद्दल त्यांचा गिनीज रेकॉर्ड आहे. बाहेरील देशांमधील सायकलिंगबाबत अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. डॉ. मनीषा वाघमारे यांचे नुकतेच चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे त्यांचे फटाक्यांची आतषबाजीने जल्लोषी स्वागत करण्यात आले.