चेहरा झाकून खावी लागणारी डिश
जगभरात कित्येक चित्रविचित्र परंपरा आहेत. तर खाण्याशी निगडित परंपरांबद्दल बोलायचे झाल्यास ड्रिंक्सपूर्वी चिअर करण्यापासून प्लेट्सचे शुद्धीकरण यासारख्या अनेक गोष्टी कित्येक भागांमध्ये पाळल्या जातात. फ्रान्समध्ये एका डिशवरून अत्यंत अनोखी परंपरा आहे. ही डिश एक पक्षी असून त्याला ओर्टोलन बंटींग म्हटले जाते, तो खाण्याशी निगडित अजब प्रथेत लोक ‘देवापासून पाप लपविण्याच्या’ उद्देशाने स्वत:चा चेहरा रुमालाने झाकून तो खात असतात. चेहरा झाकून खाण्याचा प्रकार अत्यंत अजब असला तरीही परंपरा लोकांकडून पाळली जाते.
ही डिश खाणे पाप
लोक अनेक प्रकारची नॉनव्हेज डिश खात असतात, मग ही खास डिश खाणे पाप का मानले जाते हा प्रश्न उभा ठाकतो. प्रत्यक्षात यामागील कारण या पक्ष्यासोबत होणारी क्रूरता आहे. हा पक्षी पकडला जाण्यापासून शिजवेपर्यंत त्यावर अत्यंत जुलूम केले जातात. सर्वप्रथम शिकारी या पक्ष्यांना जाळ्यात पकडतात, मग सुमारे तीन आठवड्यांपर्यंत पूर्णपणे झाकलेल्या पिंजऱ्यात किंवा बॉक्समध्ये त्याला कैदेत ठेवतात, यादरम्यान त्यांना गरजेपेक्षा अधिक प्रमाणात खायला दिले जाते. त्यांना धान्य आणि बीज इतक्या अधिक प्रमाणात खायला घातले जाते की ऑर्टोलन बंटिंग हा पक्षी फुग्याप्रमाणे फुगून जातो. त्याचे वजन तीनपट वाढते. यानंतर त्याला एका कंटेनरच्या आत आर्मग्नॅक ब्रँडीत बुडवून मॅरीनेट केले जाते. मग डिश वाढली जाण्याच्या केवळ 8 मिनिटांपूर्वी त्याचे तुकडे करत भाजण्यात येते.
एका ऑर्टोलन पक्ष्याला एकाचवेळी खाल्ले जावे अशीही परंपरा आहे. याकरता क्रूरतेच्या सर्व मर्यादा संबंधित लोकांकडून ओलांडल्या जातात. खाताना देखील लोक पक्ष्याच्या नाजुक हाडांना आणि त्याच्या चोचीचा चावा घेतात. लोक याला अत्यंत क्रूरपणे चावून थुंकून देतात. याचमुळे परंपरेनुसार लोक या पक्ष्याला खाणे पाप मानतात आणि स्वत:चा चेहरा झाकून घेत देवापासून स्वत:चे पाप लपवू पाहतात.