महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्पल थिंक टँकमध्ये सामाजिक समावेशावर चर्चा

12:29 PM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टचा एक भाग म्हणून, पर्पल थिंक टँक विभागात नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलद्वारे आयोजित परिसंवाद मालिकेचे आयोजन केले होते. या उपक्रमातील शेवटच्या दोन दिवशी मिशन अॅक्सेसिबिलिटीचे सहसंस्थापक अमर जैन यांच्यासह पॅनेल सदस्यांसह सामाजिक समावेशावर चर्चा झाली. या पॅनेलमध्ये एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक अरमान अली, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे राजेश अग्रवाल, हार्किन इन्स्टिट्यूटमधील दिव्यांगत्व धोरण विभागाचे संचालक डॅनियल व्हॅन संत, सेन्स इंटरनॅशनल इंडियाचे संचालक अखिल पॉल, एनसीपीईडीपीचे सदस्य जावेद अबिदी, आदींसह अण्णा विद्यापीठातील प्रमुख वैज्ञानिक आणि मानद प्राध्यापक यांचा समावेश होता.

Advertisement

एनसीपीईडीपीचे सदस्य अक्षय जैन यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी माहितीवर आधारित प्रभावी निर्णयक्षमता आणि धोरण निर्मितीसाठी अचूक व नेमकेपणाने सांख्यिकी संकलन करण्याचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, दिव्यांग व्यक्तींसाठी माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी सांख्यिकी संकलन करणे आणि त्याचे योग्य व नेमके विश्लेषण करण महत्त्वपूर्ण आहे. ही सांख्यिकी आपणास योग्य, प्रभावी योजना आणि धोरण विकसित करण्यास सक्षम करते. नागरिकही स्वत:तील दिव्यांगत्व ओळखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ते पुढे म्हणाले की, भारतात हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. भारतातील दिव्यांगत्वाचा दर हा 2.2 टक्के इतका नोंदला गेला आहे. जागतिक पातळीवरील दिव्यंगत्वाच्या दराशी ही विसंगती असल्याचे दिसते. त्यामुळे सांख्यिकीतील नेमकेपणा आणि अचूकता यांचे महत्त्व याबाबत विचारवंत, धुरीण यांच्यामध्ये व्यापक व गंभीरपणे चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. साहाय्यक तंत्रज्ञान, आरोग्य विमा, दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण आणि रोजगार, दिव्यांग व्यक्तींचा राजकीय समावेश, सांख्यिकीचे विश्लेषण, सेन्सर्स आणि सामाजिक समावेश आणि नवीन नेतृत्वास प्रोत्साहन, अशा नऊ गंभीर विषयांवर या उपक्रमात पॅनल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article