महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजाराची निरुत्साहात आठवड्याची सुरुवात

06:20 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स139 अंकांनी घसरणीत : अदानी एंटरप्रायझेस नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक काहीसे घसरणीसोबत बंद झालेले पाहायला मिळाले. भारती एअरटेल, विप्रोचे समभाग तेजीत होते तर अदानी एंटरप्रायझेसचे समभाग घसरणीत होते.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 139 अंकांनी घसरत 65,655 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 37 अंकांनी घसरणीसह 19694 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी मिडकॅप निर्देशांक, बीएसई स्मॉलकॅप व निफ्टी आयटी निर्देशांक काहीशा तेजीसोबत बंद झाले होते. निफ्टी बँकेनेही सोमवारी निराशादायी कामगिरी नोंदवली होती. सोमवारच्या सत्रात डिव्हीस लॅब्ज, भारती एअरटेल, विप्रो आणि एचसीएल टेक यांचे समभाग सर्वाधिक तेजी राखताना दिसले. तर दुसरीकडे अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच एसबीआय लाइफ यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले होते. मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या पटेल इंजिनियरिंगचा समभाग 5 टक्के वाढत 51 रुपयांवर बंद झाला होता. ओम इन्फ्रा, गती लिमिटेड, एक्साइड इंडस्ट्रिज आणि स्टोव्ह क्राफ्ट यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. युनि पार्टस इंडिया, कामधेनू लिमिटेड, टाटा मोटर्स, देवयानी इंटरनॅशनल आणि जियो फायनॅन्शियल यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. अदानी समूहातील 9 पैकी 5 कंपन्यांचे समभाग कमकुवत दिसून आले. अदानी विल्मर, एनडीटीव्ही, अदानी पॉवर आणि अंबुजा सिमेंट यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. यासोबत एसबीआय कार्ड, गरवारे टेक्नीकल फायबर, मारुती सुझुकी आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग लाभात राहिले हेते. तर रिलायन्स इंडस्ट्रिज, फेडरल बँक, अॅक्सिस बँक, आयआरसीटीसी, मुथुट फायनान्स, पतंजली फूडस आणि अशनिशा इंडस्ट्रिज यांचे समभाग काहीसे घसरणीत राहिले होते. ऑटो व बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांची कामगिरी सोमवारी निराशादायक ठरली. भारतात सोन्याची आयात ऑक्टोबरमध्ये वर्षाच्या तुलनेत 60 टक्के अधिक करण्यात आली असल्याची माहिती शेअरबाजाराला देण्यात आली आहे.

जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजारात मिश्र कल पाहायला मिळाला. युरोपातही साधारण हाच मिश्र कल सोमवारी दिसून आला. आशियाई बाजारात हँगसेंग 323 अंक, कोस्पी 21 अंकांनी आणि शांघाई कम्पोझीट 13 अंकांनी तेजीत होता. तर निक्की 197 अंक, स्ट्रेटस् टाइम्स 13 अंकांनी नुकसानीत होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article