सर्वसामान्यांसाठी खुली असणारी हिऱ्याची खाण
जर तुम्हाला खोदकाम करून हिरा मिळाल्यास तुमचे नशीब आपोआप चमकेल आणि तुम्ही अचानक श्रीमंत देखील व्हाल. परंतु हिरे शोधण्यासाठी त्यांच्या खाणीत खोदकाम करावे लागते. तसेच या खाणी विविध कंपन्या आणि सरकारच्या मालकीच्या असल्याने तेथे सर्वसामान्यांना जाता येत नाही. परंतु अमेरिकेत सर्वसामान्यांसाठी खुली असणारी एक खाण आहे. येथे तुम्ही एकट्याने किंवा कुटुंबासोबत जात हिऱ्यांचा शोध घेऊ शकता.
अमेरिकेच्या अरकनसास प्रांतात क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्क नावाने हिऱ्यांची खाण आहे. ये ठिकाण सर्वसामान्यांसाठी खुले आहे. येथे तुम्ही खोदकाम करून हिऱ्याचा शोध घेऊ शकता. ज्याला येथे हिरा मिळेल त्याचाच त्यावर अधिकार असतो. हिऱ्यासोबत येथे अनेक प्रकारचे जेमस्टोन देखील प्राप्त होत असतात.
येथे 37 एकरमध्ये फैलावलेले एक मैदान असून तेथे लोक ज्वालामुखीय क्रेटरमध्ये खोदकाम करतात. येथे जाणाऱ्या लोकांना सर्वप्रथम हिऱ्यांविषयी माहिती दिली जाते, मग त्यांचा शोध कसा घ्यायचा हे सांगण्यात येते. येथे तुम्ही खोदकामासाठी स्वत:सोबत अवजारं घेऊन जाऊ शकता किंवा भाडेतत्वावर मिळवू शकता. परंतु बॅटरी किंवा वीजेवर चालणाऱ्या उपकरणांवर येथे बंदी आहे.
या ठिकाणाचे नाव पूर्वी क्रेटर ऑफ डायमंड होते. 1972 मध्ये अरकनसास पार्क असे नाव करण्यात आले. आतापर्यंत येथे 35 हजार प्रकारचे हिरे शोधण्यात आले आहेत. येथे 40.23 कॅरेटचा अंकल सॅम नावाचा एक हिरा मिळाला असून तो अमेरिकेत शोधण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा ठरला आहे. याचबरोबर 16.37 कॅरेट, 15.33 कॅरेट आणि 8.52 कॅरेटचे हिरे देखील मिळाले आहेत. लोक येथे पिकनिकचा आनंद घेऊ शकतात. येथे गिफ्ट शॉप, टेंट साइड आणि डायमंड स्प्रिंग वॉटर पार्क आहे. 1 हजार रुपयांचे शुल्क भरून येथे लोकांना प्रवेश मिळतो.