For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या टप्प्यात ठरेल निश्चित दिशा

06:22 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या टप्प्यात ठरेल निश्चित दिशा
Advertisement

दुसऱ्या टप्प्यात केरळ 8 (सर्व 20 मतदारसंघ), कर्नाटक (28 पैकी 14 मतदारसंघ), राजस्थान (25 पैकी 13 मतदारसंघ), महाराष्ट्र (48 पैकी 8 मतदारसंघ), उत्तर प्रदेश (80 पैकी 8 मतदारसंघ), मध्यप्रदेश (29 पैकी 7 मतदारसंघ), आसाम (14 पैकी 5 मतदारसंघ), बिहार (40 पैकी 5 मतदारसंघ), छत्तीसगड (11 पैकी 3 मतदारसंघ), जम्मू-काश्मीर (5 पैकी 1 मतदारसंघ), पश्चिम बंगाल (42 पैकी 3 मतदारसंघ), मणिपूर (2 पैकी 1 मतदारसंघ) आणि त्रिपुरा (2 पैकी 1 मतदारसंघ) येथे निवडणूक होत आहे.

Advertisement

रालोआसाठी महत्वाचा टप्पा

दुसरा टप्पा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यातील 89 मतदारसंघांपैकी 61 जागा या आघाडीने जिंकल्या होत्या. तर विरोधकांच्या आघाडीला केवळ 22 जागांवर यश मिळले होते. अन्य पक्षांच्या वाट्याला 6 जागा आल्या होत्या. कर्नाटकातील 14 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 12 काँग्रेसला 1 आणि अपक्ष 1 अशी जागांची विभागणी होती. राजस्थानात 13 पैकी 13 जागांवर भारतीय जनता पक्षाची सरशी झाली होती. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील या पक्षाने तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने भरघोस यश मिळविले होते.

Advertisement

विरोधकांच्या आघाडीचा प्रयोग

यंदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात व्यापक राष्ट्रीय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. 2019 मध्ये कर्नाटकात काँग्रेस आणि निर्धर्मी जनता दल यांची, तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती झाली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसणार, असे बहुतके राजकीय विद्वानांचे मत होते. तथापि, याच दोन राज्यांनी भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश दिले.

विरोधकांच्या दृष्टीने केरळ महत्वाचे

दुसऱ्या टप्प्यात विरोधकांच्या दृष्टीने केरळ हे राज्य सर्वात महत्वाचे आहे. 2019 मध्ये येथे काँग्रेस आघाडीला 20 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. तर डाव्या पक्षांच्या युतीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. भारतीय जनता पक्षाची पाटी कोरी राहिली होती. यावेळीही दुसऱ्या टप्प्यातील सर्व राज्यांच्या तुलनेत या राज्याकडून विरोधकांना सर्वाधिक अपेक्षा आहे. वास्तविक, या राज्यात प्रमुख प्रतिस्पर्धी विरोधकांच्याच आघाडीतील पक्ष आहेत. येथे थेट लढत काँग्रेस आघाडी आणि डावी आघाडी यांच्यात आहे. 3 ते 4 मतदारसंघात भारतीय जनता पक्षही जोरदार प्रयत्न करीत आहे. पण यशाविषयी साशंकता आहे.

सत्ताधाऱ्यांसाठीमहत्वाची अनेक राज्ये

केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही राज्ये महत्वाची आहेत. कारण मागच्या निवडणुकीत याच राज्यांनी सत्ताधाऱ्यांना भरभरुन जागा दिल्या होत्या. यंदाही अशीच किंवा शक्य झाल्यास याहीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. तर काँग्रेस आणि विरोधी आघाडी त्यांना रोखण्यासाठी आटापिटा करणार हे स्पष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीही मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. या दोन पक्षांमधील लढतींच्या परिणामावरच या निवडणुकीचा कल निर्णायकरित्या ठरणार आहे, अशी परिस्थिती आहे.

भाजपने केले लक्ष केंद्रीत...

केवळ दुसरा टप्पा नव्हे, तर पुढचे चार टप्पे सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी निर्णायक आहेत. प्रथम टप्प्यातील 102 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 41 जागा जिंकल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यापासून सहाव्या टप्प्यापर्यंत अधिकतर जागा या पक्षाने जिंकल्यास त्याला पुन्हा सत्ता मिळविणे सोपे जाईल. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित ठेवण्याची संधीही विरोधी पक्षांना, विशेषत: काँग्रेसला याच पाच टप्प्यांमध्ये शोधावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक चुरशीची होणार आहे.  भारतीय जनता पक्षाने या आणि पुढच्या चार टप्प्यांवर प्रारंभापासूनच लक्ष केंद्रीत केलेले असून 2019 च्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

प्रादेशिक पक्षांनाही संधी

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पर्धा समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस इत्यादी प्रादेशिक पक्षांशी आहे. प्रथम टप्प्यापासूनच तिचा प्रारंभ झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यापासून थेट सातव्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिक रंगतदार होत जाईल, अशी चिन्हे आहेत. अद्यापही सर्व राजकीय पक्षांनी साहव्या आणि सातव्या टप्प्याचे सगळे उमेदवार घोषित केलेले नाहीत. साधारणत: कल पाहून ऐनवेळी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या सर्व पक्षांनी दुसऱ्या टप्प्यावरच लक्ष ठेवले आहे.

येथील निवडणूक होणार पूर्ण

मतदानाच्या प्रथम टप्प्यात तामिळनाडू, उत्तराखंड, चारही केंद्रशासित प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि मणिपूर अशा एकंदर 12 प्रदेशांमधील मतदान पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर केरळ, राजस्थान आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधले मतदान संपणार आहे. अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यानंतर एकंदर 11 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची समाप्ती होणार आहे.

ही राज्ये...हे मतदारसंघ 

केरळ (सर्व 20 मतदारसंघ)

कासरगोड (काँग्रेस आघाडी), कानूर (डावी आघाही), वायनाड (काँग्रेस आघाडी), कोझीकोड (काँग्रेस आघाडी), मल्लापुरम (काँग्रेस आघाडी), पोन्नानी (काँग्रेस आघाडी), पलक्कड (डावी आघाडी), अलाथूर (काँग्रेस आघाडी), थ्रिसूर (काँग्रेस आघाडी), चलकुडी (काँग्रेस आघाडी), एर्नाकुलम (काँग्रेस आघाडी), इडुक्की (काँग्रेस आघाडी), कोट्टायम (काँग्रेस आघाडी), अलाप्पुझा (काँग्रेस आघाडी), मावेलीक्करा (काँग्रेस आघाडी), कोल्लम (काँग्रेस आघाडी), अट्टींगल (काँग्रेस आघाडी) आणि थिरुवनंतपुरम (काँग्रेस आघाडी).

कर्नाटक (28 पैकी 14 मतदारसंघ)

बेंगळूर मध्य (भारतीय जनता पक्ष), बेंगळूर उत्तर (भारतीय जनता पक्ष), बेंगळूर दक्षिण (भारतीय जनता पक्ष), बेंगळूर ग्रामीण (काँग्रेस), चामराजनगर (निजद), चिकबळ्ळापूर (भारतीय जनता पक्ष), चित्रदुर्ग (भारतीय जनता पक्ष), दक्षिण कन्नड (भारतीय जनता पक्ष), हासन (भारतीय जनता पक्ष), कोलार (भारतीय जनता पक्ष), मंड्या (अपक्ष), म्हैसूर (भारतीय जनता पक्ष), तुमकूर (भाजप) आणि उडुपी-चिकमंगळूर (भारतीय जनता पक्ष).

राजस्थान

(25 पैकी ऊर्वरित 13 मतदारसंघ)

अजमेर (भारतीय जनता पक्ष), बन्सवारा (भारतीय जनता पक्ष), बारमेर (भारतीय जनता पक्ष), भिलवारा (भारतीय जनता पक्ष), चितोडगढ (भारतीय जनता पक्ष), जालोर (भारतीय जनता पक्ष), झलवार-पाटण (भारतीय जनता पक्ष), जोधपूर (भारतीय जनता पक्ष), कोटा (भारतीय जनता पक्ष), पाली (भारतीय जनता पक्ष), राजसमुंद (भारतीय जनता पक्ष), टोंक-सवाई माधोपूर (भाजप) आणि उदयपूर (भारतीय जनता पक्ष).

महाराष्ट्र (48 पैकी पुढचे 8 मतदारसंघ)

भिवंडी (शिवसेना), चंद्रपूर (भारतीय जनता पक्ष), कल्याण-डोंबिवली (शिवसेना), मावळ (भारतीय जनता पक्ष), नंदुरबार (भारतीय जनता पक्ष), पालघर (शिवसेना), रायगड (राष्ट्रवादी काँग्रेस), सांगली (भारतीय जनता पक्ष), सातारा (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि यवतमाळ-वाशिम (भाजप)

उत्तर प्रदेश

(80 पैकी पुढचे 8 मतदारसंघ)

बस्ती (भारतीय जनता पक्ष), दौराहा (भारतीय जनता पक्ष), दुमरियागंज (भारतीय जनता पक्ष), लखीमपूर-खिरी (भारतीय जनता पक्ष), महाराजगंज (भारतीय जनता पक्ष), मिश्रिक (भारतीय जनता पक्ष), संत कबीर नगर (भाजप) आणि सीतापूर (भाजप)

मध्यप्रदेश (29 पैकी पुढचे 7)

भिंड (भारतीय जनता पक्ष), देवास (भारतीय जनता पक्ष), मांडला (भारतीय जनता पक्ष), मंदसौर (भारतीय जनता पक्ष), राजगढ (भारतीय जनता पक्ष), रतलाम (भारतीय जनता पक्ष) आणि उज्जैन (भारतीय जनता पक्ष).

आसाम (14 पैकी पुढचे 5 मतदारसंघ)

बारपेटा (भारतीय जनता पक्ष), दिब्रुगढ (भारतीय जनता पक्ष), गुवाहाटी (भारतीय जनता पक्ष), कालीबोर (भाजपा) आणि कोक्राझार (काँग्रेस)

बिहार (40 पैकी पुढचे 5 मतदारसंघ)

अररिया (भारतीय जनता पक्ष), आरा (संजद), बक्सर (भारतीय जनता पक्ष), जमुई (लोकजनशक्ती) आणि वाल्मिकीनगर (भारतीय जनता पक्ष).

छत्तीसगड (11 पैकी पुढचे )

कांकेर (भाजप) महासमुंद (भाजप) आणि राजनंदगाव (भाजप)

पश्चिम बंगाल (42 पैकी पुढचे 3)

बहरामपूर (काँग्रेस), बीरभूम (भाजप) आणि बोलपूर (भाजप)

जम्मू-काश्मीर (5 पैकी पुढचा 1)

उधमपूर (भारतीय जनता पक्ष)

मणिपूर (2 पैकी ऊर्वरित 1)

मणीपूर बाह्या आणि मणिपूर आंतर्भागाचा अंश

त्रिपुरा (2 पैकी ऊर्वरित 1)

त्रिपुरा पूर्व

Advertisement
Tags :

.