गुरु शिष्याच्या नात्याला लाजवणारा प्रकार
शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याकडे आदर्शाने पाहिले जाते. गुरु हा शिष्याच्या जीवनातील महत्त्वाचा दिशादर्शक मानला जातो. आई-वडीलही देऊ शकत नाहीत असे ज्ञान शिक्षकाकडून विद्यार्थ्याला दिले जाते. शिक्षकांकडे नेहमी आदराने पाहिले जाते. अशातच या शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला गालबोल लागणारा प्रकार घडल्याने सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे.
एका शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत आज की राज या गाण्यावर अश्लील नृत्य करतानाचा व्हि़डीओ व्हायरल होऊन धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक आपल्या विद्यार्थिनीसोबत आज की राज या आयटम सॉंगवर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये भररस्यावर एका बसच्या बाजूल काही विद्यार्थींनींचा घोळका आहे. यामध्ये शिक्षक एक विद्यार्थिनीसोबत अश्लील नृत्य करताना दिसत आहे. हे दोघेही स्त्री २ या सिनेमातील आज की रात मजा हुस्न का या आयटम सॉंगवर नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओवर झपाट्याने कमेंटस् येत आहेत. ट्रोलर्स नी हा व्हिडीओला खूप ट्रोल केले असून इन्स्टाग्रामवरून व्हायरलही झाला आहे.
या व्हिडीओबद्दल अधिक माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही.