दिवाळी साजरी न करणारे शापित गाव
हिमाचलच्या गावात घरात कैद होतात लोक
देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. लोक दिवाळीच्या सणादरम्यान दीवे लावण्यासोबत फटाके फोडण्याचा आनंद घेत होते. परंतु भारतात एक असे गाव आहे, जेथील एकाही व्यक्तीने दिवाळी साजरी केलेली नाही.
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमध्ये एक असे गाव आहे जेथे दिवाळी साजरी करण्यात येत नाही. सम्मू गावात अनेक वर्षांपासून दिवाळी साजरी करणे तर दूरच राहिले, त्या दिवशी घरात पक्वानं देखील तयार करण्यात येत नाहीत. गावाला एक शाप असल्यानेच येथे दिवाळी साजरी केली जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने दिवाळी साजरी केली तर त्याचा आकस्मिक मृत्यू होतो असे लोकांचे मानणे आहे.
घरातून बाहेर पडत नाहीत लोक
हमीरपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील सम्मू गावात दिवाळीवेळी कुठलाच झगमगाट दिसून येत नाही. तेथे शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी करणे टाळले जात आहे. दिवाळीच्या सणावेळी तेथे दिवे पेटविले जात नाहीत, तसेच कुठल्याही परिवाराने फटाके फोडण्यासोबत घरात पक्वानं तयार केली तर गावावर आपत्ती ओढवणे निश्चित असल्याचे लोक सांगतात. कथित स्वरुपातील या शापासून मुक्ती मिळविण्यासाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. शापाची भीती असल्याने लोक सणावेळी घरातून बाहेर पडणेही टाळतात.
शेकडो वर्षांपासून गावात दिवाळी साजरी करण्यात आलेली नाही. कुणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, तर गावात कुणाचा तरी मृत्यू होतो किंवा एखादे संकट ओढवते असे 70 वर्षीय ठाकूर विधिचंद यांनी सांगणे आहे. जेव्हा दिवाळी सण येतो, तेव्हा आम्ही व्यथित होतो, कारण सर्व ठिकाणी सणाची तयारी सुरू असते, परंतु आमच्या गावात कुठल्याही घरात आनंद नसतो. गावाला या शापासून मुक्त करविण्यासाठी अनेक यज्ञ करण्यात आले, तरीही मुक्ती मिळाली नसल्याचे एका महिलेने सांगितले.
शापामागील वदंता
दिवाळीच्या दिनी गावातील एक महिला स्वत:च्या पतीसोबत सती गेली होती. महिला दिवाळी साजरी करण्यासाठी माहेरी निघाली होती, तिचा पती राजाच्या दरबारात सैनिक होता, परंतु महिला गावापासून काही अंतरावर पोहोचल्यावर तिला पतीचा मृत्यू झाल्याचे कळले होते. तेव्हा संबंधित महिला गरोदर होती. तिला हा धक्का सहन झाला नाही आणि ती पतीसाब्sात सती गेली. तसेच तिने या गावाती लोक कधीच दिवाळीचा सण साजरा करू शकणार नाहीत असा शाप तिने दिला. त्या दिवसापासून आजवर या गावात कुणीच दिवाळी साजरी केलेली नाही. लोक केवळ सतीच्या मूर्तीची पूजा करतात.