महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोलिसाला ‘पाहण्या’साठी गुन्हा

06:24 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुन्हेगार किंवा बेकायदेशीर कृत्य करणारे लोक पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, हे आपल्याला माहीत आहे. विशेषत: हरदारी पोलिसांना गुंगारा देणे आणि वेगात वाहन चालविणे किंवा अनुमतीपत्र नसताना वाहन चालविणे हा कित्येक लोक पराक्रम मानतात. अशा प्रकारे वाहन चालविताना कोणत्याही रहदारी पोलिसाने आपल्याला पाहू नये याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधल्या जातात. हेल्मेट न घालणे, कारमधून जाताना सीटबेल्ट न लावणे असे अनेक प्रकार केले जातात.

असे प्रकार केवळ भारतात घडतात असे नाही, तर विदेशांमध्ये, जिथे रहदारीच्या नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन प्रशासन आणि नागरीक यांच्याकडून केले जाते, तेथेही रहदारीचे नियम तोडण्याचे प्रकार घडतात. पण अश प्रत्येक प्रकारात आपण रहदारी पोलिसाच्या तावडीत सापडू नये याची दक्षता घेतली जाते. कित्येकदा असे प्रयत्न यशस्वीही होताना दिसतात. तथापि, कोलंबिया या देशात डेनियेला गविरीया नामक रहदारी महिला पोलीस अशी आहे, की जिच्या जवळ जाता यावे आणि तिला ‘पाहता’ यावे, यासाठी कित्येकजण, विशेषत: तरुण लोक रहदारीचे नियम मोडण्यास सज्ज असतात. ही महिला पोलीस 29 वर्षांची असून ती दिसायला अतिशय देखणी आहे. त्यामुळे भले, काही रकमेचा दंड भरावा लागला तरी चालेल पण तिचे दर्शन व्हावे, तिच्या जवळ उभे राहता यावे, शक्यतो तिच्याशी काही बोलण्याची संधी मिळावी यासाठी कित्येक तरुण हेतुपुरस्सर रहदारीचे नियम तोडताना दिसतात. ही महिला पोलिस ज्या मार्गावर सेवा देत असेल तेथे गर्दीही अधिक होते, असे बोलले जाते.
Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article