अंधारात सर्वकाही स्पष्ट पाहणारा जीव
पृथ्वीवर अनेक अद्भूत जीव असून ते स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी अनोखे मार्ग अवलंबित असतात. यातील बहुतांश प्राणी रात्री नीट पाहू शकत नाहीत. परंतु एक जीव असा आहे, ज्याला काळोख्या रात्रीत देखील सर्वकाही स्पष्ट दिसून येते. या प्राण्याचे नाव टारसियर असून तो स्वत:च्या मोठ्या आणि चमकदार डोळ्यांसाठी ओळखला जातो. टारसियर सर्वसाधारणपणे दक्षिणपूर्व आशियात आढळून येतो. याचा एक डोळा त्याच्या मेंदूइतका असतो, परंतु हा स्वत:च्या डोळ्यांमधील बुब्बुळं माणूस किंवा अन्य प्राण्यांप्रमाणे वळवू शकत नाही. त्यांना आजूबाजूचे पहायचे असल्यास पूर्ण मान फिरवावी लागते. टारसियरच्या डोळ्यांची संरचना अनोखी असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट एकाच रंगात दिसून येते. कितीही काळोख असला तरीही हा प्राणी छोटे किडे आणि पक्ष्यांना पाहू शकतो. या प्राण्याचे डोळे अत्यंत भीतीदायक असतात, परंतु हा प्राणी प्रकाशाच्या प्रत्येक फोटॉनला एकत्र करत असतो, याचमुळे त्याच्या नजरेतून काहीच वाचू शकत नाही. याचे डोळे रात्रीच्या वेळी पाहू शकणाऱ्या एखाथ्dया नाइट व्हिजन चष्म्याप्रमाणे असतात. तर थ्रेडफिन ड्रॅगनफिश हा मासा समुद्राच्या अशा हिस्स्यात आढळून येतो, जेथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. याचमुळे हा मासा पाहण्यासाठी विशेष युक्तीचा वापर करतो. याच्या शरीराचा खालील हिस्सा एकप्रकारचा प्रकाश निर्माण करत असतो.