गुन्हेगारांची पूजा करणारा देश
मंदिरांत तसविरी ठेवतात लोक
जगातील जवळपास प्रत्येक देशात गुन्हेगारांकडे तुच्छ नजरेने पाहिले जाते. लोक त्यांचा द्वेष करतात. परंतु एका देशात गुन्हेगारांची पूजा होते. गँगस्टसंना देवतेच्या स्वरुपात पाहिले जाते. लोक मंदिरांमध्ये या गँगस्टर्समध्ये त्यांची तसवीर ठेवत असतात. तसेच देवाप्रमाणे त्यांना नैवैद्य दाखविला जातो, त्यांचे गुणगान केले जाते.
व्हेनेझुएलामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात अराजकता होती. देशात हत्या, चोरी -दरोडे यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण खूपच अधिक होते. परंतु यात एक खास बाब होती, चोरी करणारे गुन्हेगार गरीबांना त्रास देत नव्हते. तसेच त्यांनी कुठल्याही गरीबाची हत्या केली नव्हती. श्रीमंतांना लुटून हे गुन्हेगार यातील काही हिस्सा गरीबांमध्ये वाटायचे. याचमुळे या गुन्हेगारांबद्दल लोकांमध्ये प्रेम निर्माण झाले होते. गुन्हेगारांची प्रतिमा लोकांमध्ये रॉबिनहुडसारखी तयार झाली होती. लोकांनी या गुन्हेगारांनाच स्वत:चा रक्षक मानले होते.
या कारणामुळे व्हायची पूजा
स्पॅनिश भाषेत या देवतांना सँटोस मॅलेंड्रोस म्हटले जाते. जवळपास प्रत्येक घरात त्यांची पूजा केली जाते. रंगबिरंगी टोपी, चमकणाऱ्या रंगाची पँट परिधान केलेल्या या लोकांच्या मूर्ती धूम्रपान करणाऱ्या मुद्रेतील असतात. जेव्हा एखादी आपत्ती येईल तेव्हा हे गुन्हेगार रक्षण करण्यासाठी येतील असे स्थानिक लोकांना वाटते. या गुन्हेगारांच्या मंदिरात जाणाऱ्या लोकांकडून एक विचित्र विधी करवून घेतला जातो. मूर्तींच्या तोंडात सिगारेट पेटविण्यास सांगण्यात येते, तसेच स्वत:चा टीशर्ट काढून आणि हातात चाकू घेऊन ओरडण्यास सांगण्यात येते.
लुई सांचेज देवतेचे नाव
यातील एका देवतेचे नाव लुई सांचेज असून तो अत्यंत शक्तिशाली गुन्हेगार होता. त्याने श्रीमंतांना लुटण्यासाठी अनेक हत्या केल्या होत्या. परंतु त्याने एक पैसाही स्वत:कडे राखला नव्हता, सर्व रक्कम गरीबांमध्ये वाटली होती. बहुतांश घरांमध्ये त्याच्या मूर्तीची पूजा केली जाते. या देवतांना मद्याचा नैवैद्य दाखविला जातो. या गुन्हेगारांच्या मूर्तींना तेथे प्रचंड मागणी असते.