For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावईवेरे येथे रस्ता खचून काँक्रिटवाहू ट्रक उलटला

01:10 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावईवेरे येथे रस्ता खचून काँक्रिटवाहू ट्रक उलटला
Advertisement

वार्ताहर /सावईवेरे

Advertisement

सावईवेरे येथील मुख्य रस्त्यावर वाहनाला बाजू देताना रस्त्याचा काही भाग खचल्याने काँक्रिट मिक्सरवाहू ट्रक उलटला. काल रविवार दि. 16 रोजी सकाळी 10 वा. सुमारास सावईवेरे बाजारापासून साधारण दोनशे मिटरच्या अंतरावर हा अपघात झाला. प्रसंगावधान राखून ट्रकचालक व क्लिनर वेळीच वाहनातून बाहेर पडल्याने सुदैवाने बचावले. जीए 06 टी 6531 या क्रमांकाचा हा तयार काँक्रिट मिक्सरवाहू ट्रक फोंड्याहून केरीमार्गे सावईवेरेकडे येत होता. सावईवेरे येथे एका संरक्षक भिंतीचे काम सुऊ असल्याने त्यासाठी तयार काँक्रिटची वाहतूक सुऊ होती. समोऊन येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याचा काही भाग खचला व ट्रक धिम्या गतीने कलंडत उलटून पडला. ट्रक कलंडत असल्याची कल्पना येताच चालक व क्लिनरने कॅबिनबाहेर उड्या घेतल्याने ते या अपघातातून सुखऊप बचावले. या घटनेमुळे दोन महिन्यापूर्वी हॉटमिक्स केलेल्या या रस्त्याच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री उशिरापर्यंत हा ट्रक काढला नव्हता.

Advertisement
Advertisement
Tags :

.