मुलींना केस कापू न देणारा समुदाय
नियम तोडल्यास मिळते शिक्षा
जगातील एका समुदाय हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे राहतो, परंतु त्याची जीवनशैली, प्रथा अत्यंत अनोख्या आहेत. प्रत्येकासाठी त्यांचे पालन करणे सोपे नाही. धर्माशी निगडित नियमांचे कठोरपणे पालन केले जाते. या समुदायातील मुली अखेरच्या श्वासापर्यंत स्वत:चे केस कापून घेऊ शकत नाहीत. एखाद्या नियमाचा भंग केल्यास समजल्यास शिक्षा सुनावली जाते.
अमेरिकेतील अमीश समुदायाच्या महिलांना हयातभर शरीरावरीस केस कापता येत नाहीत. हाता-पायावरील केसही साफ करता येत नाहीत. यामुळे पायांवरील केस लपविण्यासाठी महिलांना वेगळ्या प्रकारे कपडे परिधान करावे लागतात. हे कपडे या समुदायातील महिलाच शिवून घ्यायच्या. परंतु मागील काही वर्षांमध्ये या समुदायात आता महिलांसाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
अमीश समुदायाचे लोक ये-जा करण्यासाठी घोडागाडीचा वापर करतात. तसेच या समुदायात कुणालाही मद्यपान करण्याची अनुमती नाही. तसेच मुलांना खेळण्यांद्वारे खेळता येत नाही. मुलींकडे एक बाहुली असते आणि त्यांनाही समुदायानुसार कपडे परिधना करावे लागतात. अनेक अडचणींनंतरही अमीश समुदायाच्या लोकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. 1900 च्या दशकाच्या प्रारंभी उत्तर अमेरिकेत सुमारे 5 हजार अमीश लोक होते. आता ही संख्या 2 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे. बहुतांश अमीश लोक समुदायामध्येच राहतात. याचमुळे त्यांची लोकसंख्या वाढत असल्याचे मानले जाते. हा समुदाय इतर समुदायांमध्ये नातेसंबंध न निर्माण करण्याच्या भूमिकेसी ओळखला जातो.