Satara Politics : साताऱ्यात विकासाच्या मुद्यावर आरोप-प्रत्यारोपांची रंगली मालिका
साताऱ्यात निवडणूकीसाठी रिक्षा युतीचे अनोखे प्रचार
सातारा : साताऱ्यात तब्बल आठ वर्षांनंतर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुलवाजला असून, प्रचाराची तापलेली हवा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पक्षनिहाय उमेववारी जाहीर झाल्यानतर उमेववारानी प्रभागनिहाय पवयात्रा, घराघरांत जाऊन पत्रकवाटप करीत जोरवार शक्तिप्रवर्शन सुरू आहे. कालचे मित्र आज कट्टर विरोधक बनले असून, विकासाच्या मुद्यांवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे.
या वरम्यान, सवर बाजार परिसरातील रिक्षा स्टॉपवर एक वेगळे वृश्य पाहायला मिळाले. येथे चार वेगवेगळ्या पक्षांचा लाउड स्पीकरवरुन प्रचार करणाऱ्या रिक्षा एकत्र आल्या. चार रिक्षांच्या या अनोख्या 'युती' मुळे या रिक्षा थांब्यावर भोंग्यांचा गलका एवढा वाढला की येणारे जाणारेही वैतागुन गेले. प्रचारातल्या या वाढलेल्या आवाजामुळे या चौकात काही वेळ समोरचा काय बोलतोय हे वुसऱ्याला समजत नव्हते.