For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदूषकांनी भरलेले क्लाउन मॉटेल

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदूषकांनी भरलेले क्लाउन मॉटेल
Advertisement

200 हून अधिक विदूषकांच्या मूर्ती

Advertisement

जगात भीतीदायक घरांविषयी तुम्ही वाचले असेल, परंतु अशाप्रकारच्या घरांमध्ये किंवा त्यांच्या कहाण्यांमध्ये रुची असेल तर तुम्हाला जगातील सर्वात भीतीदायक मॉटेलविषयी निश्चितच जाणून घ्यायला आवडेल. अमेरिकेच्या नेवादाच्या टोनोपा येथे क्लाउन मॉटेल असून ते एका दफनभूमीनजीक आहे. या मॉटेलमध्ये 2 हजारांहून अधिक विदूषकांच्या मूर्तींचा अद्भूत संग्रह आहे. या रंजक मॉटेलमध्ये सर्व आकृती आणि आकारांचे 800 हून अधिक विदूषक आहेत. यात छोट्या मूर्तीपासून मानवी उंचीच्या आकृती देखील सामील आहेत.. याच्या प्रवेशद्वारावर अतिथींचे स्वागत करणारा एक विशाल विदूषक आहे. हे भयानक मॉटेल ओल्ड टोनोपा दफनभूमीला लागूनच आहे.

या दफनभूमीत मृत नवजात तसेच चांदीच्या खाणीत मृत्युमुखी पडणाऱ्या कामगारांना दफन करण्यात येते. संबंधित क्लाउन मॉटेलचा मालक विदूषकांची चित्रे तयार करतो. ही चित्रे अनेक खोल्यांमध्ये दिसून येतात. क्लाउन मॉटेलचे मालक हेम आनंद यांनी तेथे असामान्य घटनेचा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे. जणू विदूषकाच्या मूर्ती मला आम्ही येथे आहोत, याविषयी चिंता करू नकोस असे सांगत असल्याचे वाटल्याचे त्यांनी सांगितले आहे. लास व्हेगासनजीक मॉटेल खरेदी केल्यापासून 2 हजारांहून अधिक विदूषकांशी निगडित स्मरणीय सामग्रींचा संग्रह करत हेम आनंद यांनी स्वत:च्या छंदाला एका खास आकर्षणात बदलले आहे. प्रारंभी घाबरलो होतो, परंतु निश्चित एखादी दैवी शक्ती असेल याचा विचार केला होता. हे मॉटेल मी चालवावे अशी या विदूषकांचीच इच्छा असावी. येथे थीमयुक्त खोल्या तयार करण्यात आल्या असून यात एक आयटी कक्ष, ओझा कक्ष,  हेलोवीन कक्षाचा समावेश असल्याचे हेम यांचे सांगणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.