For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेत्येत बंद घर फोडले ; रोख रक्कमेसह दागिने लंपास

06:13 PM Aug 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वेत्येत बंद घर फोडले   रोख रक्कमेसह दागिने लंपास
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सावंतवाडी तालुक्यातील झाराप पत्रादेवी महामार्गालगत वेत्ये खांबलवाडी येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने घरच्या कपाटातील दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली . सीताराम पाटकर कुटुंबीय हे गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपले घर बंद करून काही अंतरावर असलेल्या एका मंदिरात धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते . दुपारी दीड वाजता पाटकर कुटुंबीय घरी आले असता घराची कौले उघडलेल्या अवस्थेत दिसून आली . त्यानंतर त्यांना घरातील कपाटातील सामान विस्कटवून टाकलेल्या अवस्थेत दिसून आले . कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरटयांनी लंपास केले . या घटनेची माहिती पोलीस पाटील रमेश जाधव यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले .

Advertisement
Advertisement
Tags :

.