For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठाकरे सेना आणि बांदा ग्रामस्थांची आरोग्य केंद्रात धडक

05:42 PM Aug 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
ठाकरे सेना आणि बांदा  ग्रामस्थांची आरोग्य केंद्रात धडक
Advertisement

आरोग्य यंत्रणेच्या कारभाराविषयी विचारला जाब

Advertisement

प्रतिनिधी
बांदा
बांदा शहरात सातत्याने डेंगीचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आज शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान आणि ग्रामस्थांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत स्वच्छता निरीक्षक बी टी जाधव यांना धारेवर धरत जाब विचारला. गणेश चतुर्थी आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने काय उपाययोजना केल्यात असा सवाल उपस्थित करण्यात आला.यावेळी श्री खान यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याशी चर्चा केली. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर औषध साठा किती शिल्लक आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी बसस्थानक, पोलीस तपासणी नाका येथे आरोग्य पथक तैनात करण्यातबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी विवेक गवस, प्रसाद परब, विजय बांदेकर, संजय गावडे, दत्ताराम बांदेकर, पीयूष बेळगावकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.