For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जाधवनगरात बंद फ्लॅट फोडला

11:20 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
जाधवनगरात बंद फ्लॅट फोडला
Advertisement

2 लाखाचा ऐवज लंपास : एपीएमसी पोलिसात नोंद

Advertisement

बेळगाव : बंद फ्लॅटचे इंटरलॉक तोडून सुमारे दोन लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. रविवारी दुपारी 4 वा. जाधवनगर येथे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मंजुनाथ कमकेरी यांनी फिर्याद दिली आहे. जाधवनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट फोडण्यात आला आहे. फ्लॅटमधील सर्व मंडळी महाशिवरात्रीनिमित्त दि. 8 मार्च रोजी सकाळी 10 वा. रामदुर्गला गेले होते. रविवारी दुपारी 4 ला बेळगावला परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कपाट फोडून 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम व 13 ग्रॅमची अंगठी असा 2 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली. वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटनांमुळे बेळगावकर हैराण झाले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतेक पोलीस अधिकारी बदलले आहेत. याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत का? असा संशय बळावला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.