महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नैसर्गिक सौंदर्य अन् संस्कृतीचा अनोखा संगम असलेले शहर

06:28 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आउटडोर रोमांच अन् अद्वितीय मंदिरांमुळे नंदनवन

Advertisement

नागानो हे जणू जपानच्या हृदयात वसलेले एक सुंदर  शहर आहे. नागानो स्वत:ची आश्चर्यकारक दृश्ये, तप्त पाण्याचे झरे आणि विश्वस्तरीय स्कीइंगसाठी ओळखले जाते. मंदिरे, तीर्थस्थळं, ऐतिहासिक स्थळांसोबत हे शहर जपानी संस्कृती आणि वारशाचा खजिना आहे. नागानो केवळ परंपरांमध्ये बुडालेले शहर नसून ते तांत्रिक नवोन्मेष आणि आर्थिक विकासाचे केंद्र देखली आहे.

Advertisement

नागानोच्या आसपास सुंदर नैसर्गिक दृश्यांचा खजिनाच आहे. शहर जपानी आल्प्सश पर्वतांसाठी हृदयाप्रमाणे आहे. जेथील भूभागांचे आकर्षक दृश्य, सरोवरं, जादुई पर्वतीय शिखरे, घनदाट जंगल दिसून येते. येथील नैसर्गिक तप्त पाण्याच्या झऱ्यांना ओन्सेन्स म्हटले जाते, ज्यातील खनिजांनी युक्त पाण्यात आरोग्य सुधारण्याची क्षमता असल्याचे बोलले जाते. याचबरोबर नागानो चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी एक लोकप्रिय स्थळ आहे. वसंत ऋतुदरम्यान शहराची उद्याने सुंदर चेरी फुलांनी सजलेली दिसून येतात.

नागानो नैसर्गिक सौंदर्यासोबत मंदिरांसाठी ओळखले जाते. सुंदर तोगाकुशी तीर्थस्थळापासून शांत जेनकोजी मंदिरापर्यंत नागानोमध्ये वास्तुकलेचा समृद्ध धार्मिक वारसा दिसून येतो. जेनकोजी मंदिर 1400 वर्षांपेक्षा अधिक जुने आहे. हे जपानमधील सर्वात महत्त्वपूर्ण बौद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे पूर्ण देशातील भाविकांना आकर्षित करते.

नागानोचा मात्सुमोतो महाल जपानच्या प्रमुख ऐतिहासिक महालांपैकी एक आहे. याच्या काळ्या बाहेरील भागामुळे याला ‘क्रो कॅसल’ या नावानेही ओळखले जाते. यात प्रभावी वास्तुकला आणि आसपासच्या पर्वतांचे आकर्षक दृश्य दिसून येते. याचबरोबर हे सिद्ध जेंक-जी नॅशनल ट्रेजर हॉलचे स्थळ आहे. या ऐतिहासिक हॉलमध्ये प्राचीन बौद्ध प्रतिमा आणि कलाकृतींसह महत्त्वपूर्ण सांस्कृतिक अवशेष आहेत. जे जपानच्या समृद्ध धार्मिक वारशाविषयी माहिती देतात.

नागानो आउटडोअर अॅक्टिव्हिटीज पसंत असलेल्या लोकांसाठी नंदनवनच आहे. स्वत:च्या सुंदर पर्वतरांगांसोबत नागानो दीर्घ वॉकिंग, स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि अन्य साहसी खेळांच्या अनेक संधी प्रदान करते. नागानो 1998 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते.

शिंशु सोबा, ओयाकी पकौडी यासारख्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी नागानो ओळखले जाते. हे शहर स्वत:च्या बकव्हीट नुडल्सच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. ज्याला सोबा या नावाने ओळखले जाते. शहराच्या सुपीक भूमीत अत्यंत उच्च दर्जाचे सफरचंद निर्माण होतात. पर्यटक देखील ताजे सफरचंद निवडण्याचा आणि सफरचंदाने तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात.

नागानो हे उत्सवांची संस्कृती असणारे शहर आहे. शहरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात. ज्यात प्रसिद्ध नागानो मात्सुरी देखील सामील आहे. यात जिवंत देखावे, पारंपरिक प्रदर्शन आणि आतिषबाजी होते. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नागानो स्नो फेस्टिव्हल आयोजित होत असतो. यात आकर्षक बर्फाच्या मूर्ती, मनोरंजन आणि जिवंत स्ट्रीट फूड स्टॉल असतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article