For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

10 वर्षांपासून निर्जन ठरलेले शहर

06:06 AM Aug 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
10 वर्षांपासून निर्जन ठरलेले शहर
Advertisement

जाण्यास घाबरतात लोक

Advertisement

शहरे वसविली जातात आणि ती नष्टही होतात, परंतु ही प्रक्रिया मंदगतीने होत असते. प्रथम शहर राहण्यायोग्य राहत नाही, मग लोक कमी होऊ लागतात, घरं जुनी होताच भग्नअवशेष ठरू लागतात. सुविधा समाप्त होण्यास प्रारंभ होते आणि लोकसंख्या विखुरली जात संपून जाते. परंतु काही शहरं किंवा वसाहतींसोबत असे घडत नाही. त्या अजबप्रकारे अचानक संपून जातात. जर्मनीत जेक्यूएच राइनडालेन नावाचे शहर असून ते आता पूर्णपणे जंगलात रुपांतरित झाले आहे.

राइनडालेन शहर कधीकधी 12 हजार ब्रिटिश सैनिक आणि त्यांच्या परिवारांचे घर होते. शीतयुद्धादरम्यान 1952 मध्ये हे वसविण्यात आले होते. हे ब्रिटनमध्ये नव्हे तर जर्मनीत आहे. 2013 पर्यंत येथील सर्व घडामोडी बंद झाल्या आणि आता तेथे केवळ वन्यप्राणी दिसून येतात.  बियर्डेड एक्सप्लोरर नावाने ओळखला जाणारा युट्यूबर कॉलिन हॉडसनने या शहराला भेट दिली.

Advertisement

हे शहर 376 हेक्टरमध्ये फैलावलले असून येथील घनदाट वृक्षांमध्ये इमारती हरवून गेल्या आहेत. शहर पूर्वी अत्यंत जिवंत होते, येथे एक एनएएएफआय सुपरस्टोअर, बीपी पेट्रोल स्टेशन, दोन पोस्ट ऑफिस, एक कापड दुकान आणि 5 प्रायमरी स्कूल्स होत्या. घरं मोठी आणि चार बेडरुमची होती. अनेक घरांमध्ये गॅरेजही होते.

शहरात काही तोडफोड आणि ग्रॅफिटीच्या खुणा आहेत. परंतु हे शहर बऱ्याचअंशी सुरक्षित आहे. सद्यकाळात या इमारतींची किंमत लाखो रुपयांमध्ये असू शकते. परंतु पूर्ण शहराची किंमत वर्तविणे अवघड आहे. 2013 मध्ये ब्रिटिश सैन्याने हे शहर जर्मन सरकारला सोपविले. तेव्हापासून याच्या भविष्यावरून अनेक योजना आखण्यात आल्या.

2015 मध्ये काही अब्जाधीश गुंतवणूकदारांनी याला एका मनोरंजन पार्कमध्ये बदलण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु यात यश आले नाही. एका हिस्स्याला नॉथराइन वेस्टफालिया पोलिसांसाठी प्रशिक्षण स्थळासाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु अद्याप तेथे काहीच ठोस घडलेले नाही.

Advertisement
Tags :

.