For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जंगलातील अनोख्या पायऱ्यांचे शहर

06:33 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
जंगलातील अनोख्या पायऱ्यांचे शहर

येथील वास्तुकला करते थक्क

Advertisement

जंगलातील पुरातन शहराच्या स्वरुपात बहुधा पेरूतील माचू पिचूचे नाव आठवते. परंतु जगात अशाप्रकारची अनेक शहरे आहेत. कोलंबियाच्या जंगलात असेच एक शहर दडलेले असून ते माचू पिचूपेक्षा 6 शतके जुतके आहे. तसेच अनेकार्थाने सुंदर आणि आकर्षक देखील आहे. या ठिकाणाचा शोध लागून फार वर्षे झालेली नाहीत आणि येथे पोहोचणे देखील सोपे नाही. तरीही जितके लोक येथे येतात, ते या जागेच्या प्रेमात पडतात.

सियाडॉड पर्डीडा ईसवी सन 800 च्या आसपास टायरोनाच्या लोकांनी वसविले होते. तसेच हे शहर 1970 पर्यंत जगापासून अज्ञात होते. या हरवलेल्या शहराचा आतापर्यंत केवळ 10 टक्के हिस्साच जगासमोर आला आहे. परंतु जितका हिस्सा पाहिला गेला आहे तो प्रत्यक्षात एक अनोखी आणि सुंदर कहाणी व्यक्त करतो.

Advertisement

सिएरा नवेदा डि सँटा मार्टा पर्वतांमध्ये राहणारे स्थानिक लोक सियोडॉड पर्डिडाविषयी जाणून आहेत. या स्थळावर 250 पेक्षा अधिक वास्तू असून त्यांचा राजनयिक, सामाजिक आणि आर्थिक स्वरुपात वापर व्हायचा. 2019 मध्ये येथील 80 एकरच्या भागात दगडी मार्ग, सुंदर पायऱ्या, कालवे आणि घर इत्यादी दिसून आले होते.

Advertisement

या ठिकाणाच्या लागलेच्या शोधाची कहाणी देखील कमी रंजक नाही. 1972 मध्ये स्थानिक लुटारूंचा लॉस सेपुल्वेडास नावाचा समूह वन्यप्राण्यांची शिकार करत असताना येथे अचानक पोहोचला होता. एका छोट्याशा पक्ष्याची शिकार करण्याच्या नादात त्यांनी पर्वतांवर काही पायऱ्या पाहिल्या, ज्यानंतर त्यांना हे शहर मिळाले आणि त्याला ‘ग्रीन हेल’ किंवा ‘वाइड सेट’ नाव देण्यात आले.

या अनोख्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणे सोपे नाही. बस किंवा रेल्वेतून नजीकच्या कुसको शहरात पोहोचल्यावर येथे जाण्यासाठी 90 मिनिटांपर्यंत पायी चालावे लागते. यादरम्यान नदी ओलांडणे, उभा पर्वत चढणे आणि कटिबंधीय उष्णतेचा सामना करावा लागतो. चार दिवसांचा हा प्रवास प्रत्येकासाठी शक्य नाही.

मागील 10 वर्षांपासून पर्यटकांसाठी खुले असूनही या ठिकाणी फारच कमी लोक पोहोचले आहेत. परंतु जो कुणी येथे पोहोचला, त्याला या प्रवासाचा आनंदमयी अनुभवच आला आहे. येथे येणारे लोक या भागाचे प्रचंड कौतुक करतात आणि अनेक पर्यटन कंपन्या देखील यासाठी पॅकेज ऑफर करत आहेत.

या शहरातील अनेक हिस्से दगडांनी तयार करण्यात आलेल्या उंच रस्त्यांशी जोडले गेले आहेत.   पायऱ्या आणि रस्ते सर्व शेतांशी जोडलेले असून यामुळे पावसाचे पाणी जमा करणे आणि नियंत्रित केले जात होते. याचा सर्वात मोठा लाभ म्हणजेच मातीचे प्रदूषण होत नव्हते. प्रत्यक्षात वास्तुकलेचा हा एक मोठा नमुना होता.

Advertisement
Tags :
×

.