वाळूत दडलेले हिऱ्यांचे शहर
जगात काही अशी ठिकाणं असतात, जी स्वत:ची शांतता आणि अवशेषांमध्ये कहाणी सामावून घेतली असतात. असेच एक ठिकाण नामीबियातील कोलमान्स्कोप आहे. हे शहर कधीकाळी हिऱ्यांच्या प्रकाशामुळे चमकलेले होते, परंतु आता वाळवंटात सामावले जात आहे. 1900 च्या प्रारंभी या भागात मोठ्या प्रमाणात हिरे सापडले, मग पाहता-पाहता कोलमान्स्कोप एक समृद्ध आणि प्रख्यात शहर ठरले. जर्मनीतील लोक येथे येऊन स्थायिक होऊ लागले आणि त्यांनी याला स्वत:च्या घरासारखे स्वरुप दिले. येथे जर्मनशैलीतील एकाहून एक सरस आलिशान घरं होती, ज्यांची रचना आजही पाहण्याजोगी आहे. शहरात पूर्ण समुदाय होता, रुग्णालय, थिएटर, शाळा देखील होती. वीज, पाणी आणि बर्फ निर्माण करण्याच्या सुविधा देखील होत्या. त्या काळात वाळवंटादरम्यान हे शहर एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. लोक येथून हिरे काढून मोठी कमाई करत होते आणि स्वत:चे जीवन ऐषोरामात जगत होता. त्या काळात कोलमान्स्कोप हे समृद्धतेचे प्रतीक होते.
हिरे संपताच रिकामी झाले शहर
प्रत्येक कहाणीचा एक अंत असतो असे बोलले जाते. कोलमान्स्कोपचे नशीबही नेहमीच तसेच राहिले नाही. काही दशकांपर्यंत खूप हिरे मिळाले, परंतु हिऱ्यांचे प्रमाण कमी होऊ लागले, आसपासच्या भागांमध्ये हिऱ्यांचे भांडार मिळू लागले आणि लोकांचे या शहरातून स्थलांतर सुरू झाले. एक-एक करून लोकांनी हे शहर सोडण्यास सुरुवात केली. 1950 च्या दशकापर्यंत कोलमान्स्कोप जवळपास पूर्णपणे रिकामी झाले.
आलिशान आठवणी वाळूत दडप
आता कोलमान्स्कोप एक घोस्ट सिटी ठरले आहे. येथे केवळ रिकामी घरांचे अवशेष आहेत, ज्यांना नामीबियाचे विशाल वाळवंट गिळकृंत करत आहे. वाळू आता खिडक्या आणि दरवाजांमधून घरांच्या आत शिरली असून खोल्यांमध्ये वाळूंचे मोठे ढिग जमा झाले आहेत. जेथे कधी लोक राहायचे, खायचे-प्यायचे, तेथे आता केवळ वाळू आणि शांतता आहे. फोटोग्राफर्स आणि रोमांच पसंत करणाऱ्या लोकांसाठी हे एक पसंतीचे ठिकाण ठरले आहे.