For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय हॉकी संघाला जर्मनीचे उट्टे काढण्याची संधी

06:12 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय हॉकी संघाला जर्मनीचे उट्टे काढण्याची संधी
Advertisement

दोन सामन्यांची हॉकी मालिका आजपासून

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय हॉकी 10 वर्षांच्या अंतरानंतर राजधानीत परतत असून ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारत आज बुधवारपासून येथे सुरू होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत विश्वविजेत्या जर्मनीविऊद्ध लढेल. यावेळी काही नवीन चेहऱ्यांची चाचणी घेण्याचा उद्देश भारतीय संघ व्यवस्थापन बाळगेल तसेच पाहुण्यांनी हल्लीच जो पराभव केला होता त्याचा बदला घेण्याचा हेतू घेऊनही संघ मैदानात उतरेल.

Advertisement

दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हे एकेकाळी खेळाचे माहेर मानले जायचे. गेल्या 10 वर्षांपासून तेथे एकही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केलेला नाही. येथे खेळला गेलेला शेवटचा सामना म्हणजे 2014 ची हीरो वर्ल्ड लीग फायनल होती. मात्र आंतर-विभागीय हॉकी येथे अधूनमधून आयोजित केली गेली आहे. पण जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या संघाविऊद्धचे बुधवार आणि गुऊवारी होणारे दोन कसोटी सामने या खेळाला उत्तम पुनरागमन करण्याच्या दृष्टीने योग्य ठरतील.

मिळालेल्या माहितीनुसार, 12,000 हून अधिक चाहत्यांनी खासगी तिकीट पोर्टलद्वारे ऑफरवरील विनामूल्य तिकिटांसाठी आधीच नोंदणी केली आहे. नॅशनल स्टेडियमची आसनक्षमता 16,000 पेक्षा थोडीशी जास्त आहे. टोकियो व पॅरिस येथे मिळविलेल्या ऑलिम्पिक कांस्यपदकांनंतर जोमाने प्रगती करत असलेल्या भारतीय हॉकीसाठी या दोन कसोटी सामन्यांना खूप महत्त्व आहे.

फ्रान्सच्या राजधानीत हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीयांना उपांत्य फेरीत जर्मनीकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. पॅरिसमधील पराभवाचा बदला घेण्याची ही भारताला चांगली संधी आहे. परंतु जर्मन संघाला हरविणे सोपे नाही. कारण ते विद्यमान विश्वविजेते आहेत आणि त्यांनी पॅरिसमध्ये आपले कौशल्य दाखविलेले आहे. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत नेदरलँड्सकडून त्यांना शूटआउटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

रँकिंग पाहता जर्मनीचे पारडे भारी आहे. कारण भारत सध्या जगात पाचव्या स्थानावर आहे. परंतु आधुनिक हॉकीमध्ये आघाडीच्या 10 संघांमध्ये क्वचितच फारसा फरक दिसून आलेला आहे आणि कोणीही त्यांच्या दिवशी उच्च स्थानावर असलेल्या प्रतिस्पर्ध्याला हरवू शकतो. उभय संघांमधील मागील पाच लढतींत भारताने तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकपासून भारताने मोठी भरारी घेतली आहे. संघाने अंतिम फेरीत यजमान चीनचा 1-0 असा पराभव करत सप्टेंबरमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले. भारताने जर्मनीविरुद्धच्या या दोन सामन्यांसाठी युवा खेळाडू आणि अनुभव यांचे मिश्रण केले आहे. भारतीयांचे नेतृत्व स्टार ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत करणार आहे, तर मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद उपकर्णधार असेल.

Advertisement
Tags :

.