महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबादच्या धडाक्यापुढे टिकण्याचे ‘आरसीबी’समोर आव्हान

06:55 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे आज गुरूवारी येथे होणार असलेल्या सामन्यात आमनेसामने येणार असून यावेळी सनरायझर्स आपल्या दमदार फलंदाजीचा रॉयल चॅलेंजर्सला पुन्हा एकदा तडाखा देण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या आयपीएलमध्ये 250 धावांचा टप्पा सनरायझर्सने तीनदा ओलांडलेला आहे.

Advertisement

या मोसमात सनरायझर्सच्या फलंदाजीच्या सामर्थ्याचा पहिला फटका मुंबई इंडियन्सला बसलेला असला, तरी ट्रॅव्हिस हेडच्या नेतृत्वाखालील त्यांच्या फलंदाजीच्या आक्रमणाचा सर्वांत जास्त तडाखा आरसीबीला बसलेला आहे. त्यांच्याविरुद्धच सनरायझर्सने बेंगळूरूमध्ये सर्वाधिक 3 बाद 287 धावांची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध हैदराबादने पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता विक्रमी 125 धावा केल्या आणि आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 300 धावांचा टप्पा ओलांडला जाण्याची चिन्हे दाखविली.

आरसीबीच्या कमकुवत माऱ्याविऊद्ध सनरायझर्सने पुन्हा एकदा नवीन उच्चांक नोंदविल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांच्या गोलंदाजी विभागातील संघर्षाचा अंदाज यावरून लावता येईल की, त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज यश दयाल  हा एकूण यादीत सात बळींसह 24 व्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या आरसीबीने गेल्या पाच सामन्यांमध्ये किमान 180 धावा दिलेल्या आहेत. मागील दोन सामन्यांत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली.

आरसीबीच्या फलंदाजांनी गोलंदाजीतील गंभीर उणिवा भरून काढण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. परंतु संतुलनाच्या अभावी या संघाटकडून अष्टपैलू कामगिरी घडणे जवळजवळ अशक्य दिसते. आरसीबीच्या फलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून 6 बाद 222 अशी धावसंख्या उभारल्यानंतर देखील त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून केवळ एका धावेने पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यातील फलंदाजांचे सामूहिक प्रयत्न आरसीबी व्यवस्थापनाला बऱ्याच प्रमाणात दिलासा देऊन गेले असतील.

विराट कोहली त्या सामन्यात वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. परंतु तो आरसीबीचा स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज राहिलेला असून त्याने 379 धावा केलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूने सनरायझर्सकडेही अनेक तडाखेबंद फलंदाज आहेत. हेडचा खेळ केवळ आक्रमकता आणि प्रत्येक संधीचा फायदा घेण्याच्या क्षमतेवरच अवलंबून नाही, तर क्षेत्रक्षकांमधील मोकळ्या जागेतून अचूक चेंडू फटकावण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे. अभिषेक शर्माही त्याच्या संगतीत बहरला आहे आणि हेन्रिक क्लासेनने देखील या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. एकूणच पाहता सनरायझर्सच्या फलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांच्या गोलंदाजांचे आणि कर्णधार पॅट कमिन्सचे काम सोपे झाले आहे. सात सामन्यांतून 10 गुणांसह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंह यादव, उमरान मलिक, नितीशकुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article