For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानविरुद्ध पुनरागमनाचे हैदराबादसमोर आव्हान

06:50 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानविरुद्ध पुनरागमनाचे हैदराबादसमोर आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचा आणि आपली मोहीम पुन्हा ऊळावर आणण्याचा प्रयत्न हैदराबाद करेल. राजस्थान प्लेऑफसाठी पात्र ठरल्यात जमा असल्याने त्यांच्यापेक्षा सनरायझर्ससाठी हा सामना जास्त महत्त्वाचा आहे.

काही दिवसांपूर्वी विलक्षण फॉर्ममध्ये राहिल्यानंतर सनरायझर्स गुणतालिकेतील पहिल्या चार संघांमधून बाहेर पडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याविरुद्ध लागोपाठ पराभवांचा सामना करावा लागल्याने हा प्रसंग त्यांच्यावर आला आहे. त्या सामन्यांत त्यांना लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. पाच विजय आणि चार पराभवांसह हैदराबादचे आता 10 गुण झाले असून ते पाचव्या स्थानावर आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाच्या अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांना हे मान्य करणे भाग पडले आहे की, दुसऱ्या डावात फलंदाजांनी अतिआक्रमक धोरण पत्करणे तितकेसे ठीक नाही. सनरायझर्सने या मोसमात 250 धावांचा टप्पा तीनदा ओलांडला आहे, पण या सर्व धावसंख्या त्यांनी प्रथम फलंदाजी करताना उभारल्या आहेत. याउलट ते एकदाही 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वीरीत्या पाठलाग करू शकलेले नाहीत.  आम्ही पाठलाग करताना किती चांगले आहोत हे पाहावे लागेल.

Advertisement

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्याकडून केल्या जाणाऱ्या स्फोटक सुऊवातीवर सनरायझर्स खूप अवलंबून आहे. त्यामुळे ही जोडी चमकेपर्यंत सारे काही ठीक असते. पण जेव्हा ते अपयशी होतात तेव्हा आपल्या डावाची फेरउभारणी अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे ध्येय हा संघ बाळगून असेल. एडन मार्करमनेही आता आपले संघातील स्थान सार्थ ठरवून दाखविण्याची वेळ आली आहे. हा हंगाम आतापर्यंत त्याच्यासाठी खूपच खराब राहिलेला आहे.

दुसरीकडे, आघाडीवर असलेले राजस्थान रॉयल्स आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. आपण कुठल्याही ठिकाणी जाऊन खेळण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे या संघाने दाखवून दिलेले आहे. ते 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा चार गुणांनी ते पुढे आहेत. जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांचा समावेश असलेली रॉयल्सची वरची फळी जबरदस्त आहे. हे तिन्ही फलंदाज फॉर्मात आहेत.

शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल या वेस्ट इंडिज जोडीने आणि तऊण रियान पराग व ध्रुव जुरेल यांनी देखील दाखवून दिले आहे की, ते कधीही आक्रमक भूमिका पत्करू शकतात. त्यांच्याकडे तितकाच शक्तिशाली माराही आहे, ज्यात युजवेंद्र चहल, अनुभवी ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि संदीप शर्मा यांचा समावेश आहे.

संघ : राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंह यादव, उमरान मलिक, नितीशकुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.