महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भेंडीसहीत, मिरचीचे शतक

12:29 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लसूण अजूनही 400 ऊपये प्रतिकिलोवर : बाजारपेठात भेंडीचा तुतवडा,बाजारातील भाज्यांच्या दरात तफावत

Advertisement

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ होत चालली असून, वाढत्या दरवाढीचा त्रास सामान्य नागरिकांना होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे नागरिक अगोदरच त्रस्त होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात वाढ झाली होती. परंतु सध्या पणजी बाजारपेठात कांदा  व टोमॅटोचे दर उतरले आहेत. तर भेंडीसहीत मिरचीने शतक गाठले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून लसूणाचे भाव 400 ऊपये प्रतिकिलोवर आहेत.

Advertisement

भेंडीने गेल्या काही दिवसांपासून शतक गाठले आहे. त्यानंतर मात्र पणजी बाजारपेठात भेंडीचा तुतवडा जाणवत आहे. भेंडीचे दर वाढल्याने भेंडीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे पणजी बाजारपेठातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच    सद्या पणजी बाजारपेठात मिर्ची 100 ऊपये प्रतिकिलोच्या दरात विकली जात आहे. वालपापडी, ढबू, चिटकी यासारख्या भाज्यांच्या दरात वाढ होत चालली आहे.   लसूणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून, 400 ऊपये प्रतिकिलो दराने सद्या लसूण गेल्या काही दिवसांपासून पणजी बाजारपेठात विकली जात आहे. बेळगावहून आवश्यक सुक्या लसूणाचा नवीन माल राज्यात येत नसल्याने लसूणीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्यांच्या दराट घट झाली आहे. त्यानुसार कांद्याचे दर खुल्या बाजारपेठात तसेच फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर उतरले आहेत. गोमंतकीयांच्या जेवणात भाज्यांच्या वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे भाज्यांच्या दरात थोड्या प्रमाणात झालेली वाढ सुद्धा सामान्य जनतेला त्रस्त करून जाते. तसेच गोव्यात जास्तशा भाज्यांची आयात बेळगाव, महाराष्ट्रातून केली जाते. त्यामुळे तिकडे भाज्यांच्या दरात वाढ झाली किंवा पिंकावर परिणाम झाला की त्याचा फटका गोव्याला सहन करावा लागतो. सरकारने फलोत्पादन महामंडळाच्या दुकानांवर कमी दरात भाज्यां उपलब्ध केल्या असल्या तरी खुल्या बाजारपेठातील भाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सामान्यत: मे महिन्यात भाज्यांचे दर वाढताना दिसतात. परंतु अवेळी पडलेल्या पाऊसामुळे थोड्या फार प्रमाणात भाज्यांच्या पिकावर परिणाम झाला असून, भाज्य़ांचे दर वाढत चालले आहेत. दरम्यान, खुल्या बाजारात दर वाढल्याने स्थानिक भाज्यांची मागणी वाढली आहे. वाढलेल्या दरांमुळे सामान्य लोक ग्रामीण भागांतून आलेल्या ताज्या भाज्यांची खरेदी करताना दिसतात. त्यात गावठी वाल, मुळा, लाल भाजी, गावठी भोपळा, माडी, रताळी अशा भाज्यांचा समावेश आहे.

पणजी बाजारपेठ व फलोत्पादनाचे दर (प्रतिकिलो ऊ.)

भाजी            पणजी बाजारपेठ        फलोत्पादन दर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article