महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नदी, जंगल सामावून घेणारी गुहा

06:22 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगातील सर्वात मोठ्या गुहेचा मान

Advertisement

जगात अशा अनेक जागा आहेत, ज्याबद्दल लोकांना फारच कमी माहिती असते. तर पूर्णपणे शोधण्यात आलेल्या अशा काही जागा आहेत, ज्यातील वातावरण आणि स्थिती हैराण करणारी असते. व्हिएतनामच्या पोंग न्हा के-बांग नॅशनल पार्कमध्ये हांग सोन डोंग नावाची एक जागा असून ही जगातील सर्वात विशाल गुहा आहे. ही गुहा एकप्रकारे वेगळे जगच असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Advertisement

ही गुहा इतकी मोठी आहे की यात स्वत:चा समुद्र किनारा, नदी आणि जंगल देखील आहे. एक शेतकरी हो खान यांनी 1990 मध्ये स्वत:च्या बालपणी लाकडं गोळा करताना सर्वप्रथम या गुहेचा शोध लावला होता. तर 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये ब्रिटिश केवर्सनी सर्वप्रथम यात पाऊल ठेवले होते आणि याविषयी माहिती जमविण्यास सुरुवात केली होती. ही गुहा अनेक रहस्यांना स्वत:मध्ये सामावून असल्याचे या केवर्सना आढळून आले होते.

660 फूट उंच

2013 च्या अखेरीस ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. अशा स्थितीत अॅडव्हेंचरचे शौकीन असणारे लोक व्हिएतनाममध्ये हँग सोन डूंगपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मैलची वाट तुडवून येथे कॅम्पिंग करतात. ही गुहा 660 फूट उंच, 500 फूट रुंद आणि तीन मैल (4.82 किमी) लांब आहे. याच्या आत दोन विशाल छिद्रांमधून सूर्यप्रकाश प्रवेश करत असतो. या गुहेत स्वत:ची नदी, जंगल असून यात अनेक माकडांचा देखील वावर आहे.

अशी जागा दुसरीकडे नाही

हँग सोन डूंगचे मानचित्रण करणाऱ्या केविंग टीमचे प्रमुख हार्वर्ड लिम्बर्ट यांनी जगात अशी जागा दुसरीकडे कुठलेच नसल्याचे म्हटले आहे. गुहेच्या अआत असामान्य आणि अद्भूत जागा असून यात 400 दशलक्ष वर्षे जुने फोसिल (जीवाश्म) देखील सामील आहे. ही गुहा मलेशियाच्या डीयर केवपेक्षा 5 पट मोठी आहे. याची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी पर्वतावरून कोसळणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळे झाली आहे. हँग सोन डूंग ही आता जगातील सर्वात मोठी गुहा ठरली आहे.

ऑस्ट्रेलियन छायाचित्रकार जॉन स्पियर्स 2015 मध्ये गुहेत पोहोचले होते. गुहेचा आयाम अविश्वसनीय आहे, जगातील सर्वात मोठ्या गुहेत 5 रात्री वास्तव्य करणे आमच्या जीवनातील सर्वोत्तम निर्णय होता असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article