Solapur Crime : सोलापुरात दागिने चोरल्याच्या संशयावरून मावशीविरुद्ध गुन्हा दाखल
मुस्लिम पाच्छा पेठेत मावशीवर दागिने चोरीचा गुन्हा दाखल
सोलापूर : मावशीने घरातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी निजामुद्दीन इब्राहिम बिजापुरे (वय २३, रा. रबिया अपार्टमेंट, मुस्लिम पाच्छा पेठ) यांनी आपली मावशी आसमा परवीन आरिफ जमादार (रा. शास्त्रीनगर, सोलापूर) हिच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आसमा जमादार यांनी १० ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी निजामुद्दीन बिजापूरे यांच्या मुस्लिम पाच्छा पेठ येथील घरातील रोख रक्कम तसेच दीड तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस व अर्घा तोळे वजनाची कानातील कर्णफुले असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असावा, असा फिर्यादी यांचा संशय आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक पाटील तपास करत आहेत.