महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजकोट राड्यातील ४२ कार्यकर्त्यांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल

03:16 PM Aug 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

राजकोट येथे काल झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी राणे समर्थक तसेच ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी दरम्यान काल दुपारी राणे समर्थक व ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात संभाजी पाटील, मेहेक परब हे पोलीस कर्मचारीही जखमी झाले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले. त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # malvan # tarun bharat news # rajkot #
Next Article