For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणी उशिरा दिल्याने हॉटेलमध्ये घुसवली कार

04:10 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
पाणी उशिरा दिल्याने हॉटेलमध्ये घुसवली कार
Advertisement

चिपळूण

Advertisement

पाणी उशिरा दिल्याच्या कारणातून हॉटेल मालकाशी वाद घालून तेथील कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घालण्यासाठी एका मद्यपी ग्राहकाने कार त्या हॉटेलमध्ये घुसवल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास शहरातील ओमीज किचन हॉटेल येथे घडला.

सुदैवाने हॉटेलसमोर अनेक दुचाकी पार्प असल्याने त्यावर ही कार धडकली. यात चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले असून एखाद्या फिल्मी स्टाईलपमाणे घडलेल्या या पकरणी त्या मद्यपीवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद विजय आयरे (48, रा. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.