घटस्फोटितांच्या विवाहाच्या ‘आठवणी’ दूर करणारा व्यवसाय
सध्या बिझनेसच्या अनोख्या कल्पना दिसून येत आहेत. काही कल्पनांबद्दल कुणीच विचार केला नसेल अशा आहेत. अशाच एका व्यवसायाबद्दल सध्या चर्चा आहे. यात कंपनीचे काम घटस्फोटित लोकांच्या विवाहाशी निगडित आठवणी दूर करणे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे देशभरात हा व्यवसाय जोर पकडू लागला आहे. कंपनीकडे मोठ्या संख्येत ग्राहक येत आहेत.
हा व्यवसाय चीनमध्ये लियु नावाच्या व्यक्तीने सुरू केला आहे. लियु हा शांडोंग प्रांतातील लँगफँग येथे राहणारा आहे. त्याने घटस्फोटित लोकांच्या खासगीत्वाच्या सुरक्षेच्या उद्देशासोबत हा बिझनेस सुरू केला होता. लियुने सर्वप्रथम एक सर्व्हिस सेंटर सुरू केले हेते. विवाहाची बहुतांश छायाचित्रे अॅक्रेलिक मटेरियलद्वारे तयार होता, जी सहजपणे जाळता येत नाहीत. अनेक ठिकाणी जिवंत लोकांची छायाचित्र न जाळण्याची देखील प्रथा आहे. तर त्यांना कचऱ्यात फेकणे खासगीत्वासाठी धोकादायक ठरू शकते असे लियूचे सांगणे आहे.
हा व्यवसाय मी प्रामुख्याने खासगीत्व विचारात घेत सुरू केला आहे. विवाहाची छायाचित्रे खासगीत्वाच्या अंतर्गत येतात. याचमुळे माझ्या सेवेला मोठी मागणी असल्याचे लियुचे सांगणे आहे. लियुची कंपनी लोकांना सेवा देण्याच्या बदल्यात मोठी रक्कम आकारते, याबद्दल लोकांना कुठलीच समस्या नाही. लियु हे 500-1000 रुपयांमध्ये लोकांचे काम करून देतात. सेवेचे शुल्क छायाचित्रांच्या वजनावर निर्भर असते. सर्वप्रथम लोकांना स्वत:ची छायाचित्रे पाठवावी लागतात. मग पूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, स्टाफ छायाचित्रांवर पेंटचा स्प्रे करतो. त्यांना प्रोफेशनल पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापण्यात येते. अखेरीस हा कचरा नष्ट करण्यासाठी ऊर्जा प्रकल्पात पाठविण्यात येतो. याचा व्हिडिओ पडताळणीसाठी ग्राहकाला पाठविण्यात येतो.